बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मागील काही महिन्यापासून राज्यभरात कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून ७ घसुखोर बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरामध्ये ३ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. ही कारवाई आरसीएफ पोलिसांनी केली आहे.
सोहंग आशिर मुल्ला (२६), जाहिदुल इस्लाम ईमुल (२८), नोयम अफजल हुसेन शेख (२५),आलामीन शेख (२३), सुमा जहीगीर आलम तुटूल(२४), तावमीना अख्तर राजू (३४) ,सलमा मोकसद अली (३५) असे अटक करण्यात आलेल्या घसुखोर बांगलादेशी नागरिकांचे नावे आहेत.
पूर्व उपनगरातील चेंबूर माहुल गाव परिसरात मोठ्या प्रमाणात घुसखोर बांगलादेशी मागील काही वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरसीएफ पोलिसांनी अधिक माहिती काढून ७ संशयित बांगलादेशी नागरिकाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता हे सात जण २०२० मध्ये भारतात अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून आल्याची माहिती समोर आली, पोलीसानी त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे मिळून आले नाही.
हे ही वाचा :
मनोरुग्णाच्या हल्ल्यात पोलीस अंमलदार जखमी, सेल्फी पॉईंटवरील घटना!
लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार कसे जोडले गेले?
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
गुरुवारी सायंकाळी या सात ही घुसखोर बांगलादेशी नागरिकाविरुद्ध कलम- नियम ३ सह ६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० सह परिच्छेद ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरिक कायदा १९४६ अनव्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून मुंबईतील चेंबूर माहुल गाव येथे भाडेतत्वावर बेकायदेशीर राहण्यास होते, हॉटेल मध्ये वेटर आणि बार गर्ल म्हणून काम करीत होते अशी माहिती समोर आली. दलालाच्या मदतीने त्यांनी भारतात बेकायदेशीर घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.