प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री मेहर अफरोज शाओन हिला ढाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्रीवर देशद्रोहाचा आरोप आहे, ज्या अंतर्गत पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अभिनेत्री मेहर बांगलादेशच्या सध्याच्या सरकारविरुद्ध बोलत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या सरकारवर उघडपणे टीका करणाऱ्या अभिनेत्री मेहर अफरोज या दिवंगत बांगलादेशी लेखक हुमायून अहमद यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, काही लोकांनी अभिनेत्रीच्या वडिलोपार्जित घराला आग लावली असल्याची माहिती समोर आली आहे.
द डेली स्टारच्या वृत्तानुसार, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या (डीएमपी) गुप्तहेर शाखेने (डीबी) गुरुवारी, ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अभिनेत्री मेहरला राजधानीच्या धनमोंडी परिसरातून ताब्यात घेतले. अभिनेत्रीने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मोहम्मद युनूस राजवटीवर आणि विशेषतः त्यांच्या प्रेस सल्लागारावर उघडपणे टीका केली होती. या प्रकरणी तिच्यावर कारवाई करत तिला अटक करण्यात आली.
ढाका महानगर पोलिस (डीएमपी) चे अतिरिक्त आयुक्त (डीबी) राजुल करीम मलिक यांनी मेहरच्या ताब्यात असल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, मेहर अफरोज शाओनला राज्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. तिला सध्या चौकशीसाठी डीबी कार्यालयात नेण्यात येत आहे. अभिनेत्रीविरुद्ध काही गुन्हा दाखल झाला आहे का असे विचारले असता, ते नंतर उघड होईल असे अधिकाऱ्याने सांगितले.
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
महाकुंभ परिसरात तिसऱ्यांदा आगीची घटना!
अलास्कातील विमान रडारवरून अचानक गायब, १० बेपत्ता
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पाच वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात!