आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदू मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संतापलेल्या मोहम्मद अबू बकरने तरुणीच्या कुटुंबावर आणि घरावर पेट्रोल ओतत जाळण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेतून तरुणी थोडक्यात बचावली. मात्र, कुटुंबातील दोन दोन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
लक्ष्मी ताती असे हिंदू तरुणीचे नाव आहे. मोहम्मद अबू बकर हा तरुणीच्या संपर्कात येवून त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव टाकला. यावेळी त्याने आपली ओळख लपविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. लक्ष्मीने लग्नास नकार दिल्यावर, मोहम्मद बकरने तिला त्याच्या घरी येण्यास भाग पाडले. तथापि, ती पळून जाण्यात यशस्वी झाली. रागाच्या भरात मोहम्मद बकर रात्री उशिरा तिच्या घरी गेला आणि बदला घेण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घरात घुसला.
हे ही वाचा :
महाकुंभ परिसरात तिसऱ्यांदा आगीची घटना!
अलास्कातील विमान रडारवरून अचानक गायब, १० बेपत्ता
प्रभू श्री राम मंदिराची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे निधन
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पाच वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात!
बक्करने घरात पेट्रोल ओतून संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत लक्ष्मीचे पालक सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु लक्ष्मीचे काका आणि भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर लक्ष्मीच्या कुटुंबाने ढेकियाजुली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि ५ फेब्रुवारीच्या रात्री आरोपी अबू बकरला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.