27.9 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरविशेषस्वातंत्र्य दिनानिमित्त अंतराळातून तिरंग्याला खास ‘स्पेस सलाम’

स्वातंत्र्य दिनानिमित्त अंतराळातून तिरंग्याला खास ‘स्पेस सलाम’

रशियन अंतराळवीरांनी तिरंगा फडकवत दिल्या शुभेच्छा

Google News Follow

Related

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रशियाच्या अंतराळवीरांनी थेट अंतराळातून भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) असलेल्या तीन रशियन अंतराळवीरांनी तिरंगा हातात घेत भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष व्हिडिओ संदेश दिला. पृथ्वीपासून सुमारे ४०८ किलोमीटर उंचीवरून आलेल्या या शुभेच्छांनी भारत-रशिया मैत्रीला अंतराळाची उंची मिळाली आहे.

रशियन अंतराळवीर प्योत्र दुब्रोव्ह, अॅना किकिना आणि आंद्रे फेद्यायेव यांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अॅना किकिना यांनी अंतराळातून भारताचे सौंदर्य पाहून कौतुक केले. तर आंद्रे फेद्यायेव यांनी भारत आणि रशियामधील दीर्घकाळापासूनच्या मैत्रीचा उल्लेख करत ‘भारत-रशिया मैत्री चिरायू होवो’ असा संदेश दिला. अंतराळवीरांनी तिरंगा हातात धरून दिलेला संदेश सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अंतराळातून आलेल्या या शुभेच्छांमुळे भारत-रशिया संबंध आणि दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.

भारत आणि रशियाचे अंतराळ क्षेत्रातील सहकार्य अनेक दशकांपासून सुरू आहे. सोव्हिएत कॉस्मोनॉट युरी गागरिन यांच्या भारत भेटीपासून ते भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेपर्यंत या सहकार्याला मोठा इतिहास आहे. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत Soyuz T-11 मोहिमेतून अंतराळात प्रवेश केला होता.

हे ही वाचा:

चीनच्या बाजारात भारतीय वस्तूंची मागणी वाढली

‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक

मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!

भारत सध्या आपल्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेच्या तयारीत रशियाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भारतीय अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी रशियातील युरी गागरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अंतराळ स्थानकावरून आलेला हा संदेश भारताच्या वाढत्या मानवी अंतराळ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा