30 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरक्राईमनामादिल्ली पोलीस ठाण्यात नबीलने मारला नऊ कर्मचाऱ्यांना चाकू

दिल्ली पोलीस ठाण्यात नबीलने मारला नऊ कर्मचाऱ्यांना चाकू

पोलिसांनी गोळ्या मारून केले जखमी

Google News Follow

दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात सोमवारी एका ३० वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला करून पाच पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले. त्यानंतर पोलीस ठाण्यातून पळून जाताना त्याने पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरही चाकूने हल्ला केला. या दुसऱ्या हल्ल्यात आणखी चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांची संख्या नऊवर पोहोचली आहे. आरोपीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आठ गोळ्या झाडल्या. त्यापैकी सहा गोळ्या आरोपीच्या दोन्ही पायांमध्ये लागल्या.

नबील असे आरोपीचे नाव असून, त्याला दुपारी सुमारे २.३० वाजता चौकशी आणि समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याची आई आणि बहिणीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नबील आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीणही पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या.

हे ही वाचा:

पहिल्या बुलेटट्रेनची मे २०२७ मध्ये चाचणी

कुर्ला हल्ला प्रकरणी ८-१० वयाची दोन मुले ताब्यात

गोध्रा ट्रेन हत्या कांडातील दोषीला वैद्यकीय जामीन

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबील खिशात एक लहान चाकू घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. त्याच्याशी चर्चा सुरू असताना त्याने अचानक चाकू बाहेर काढून पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन उपनिरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

हल्ल्यानंतर नबील पोलीस ठाण्यातून पळून गेला. सुरुवातीला तो पायी पळाला आणि त्यानंतर एका व्यक्तीची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि जवळच्या परिसरात त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

जवळपास दोन तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळीही नबीलने चाकूने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात विशेष पथकाचे (स्पेशल स्टाफ) चार कॉन्स्टेबल जखमी झाले.

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे स्पष्ट केले आहे. आरोपीला नियंत्रणात आणण्यासाठी एकूण आठ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी सहा गोळ्या नबीलच्या दोन्ही पायांना लागल्या. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्याला उपचारासाठी लोकनायक रुग्णालयात (एलएनजेपी) दाखल करण्यात आले.

या घटनेत जखमी झालेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी चौघांवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित पाच जणांना सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाचपैकी चार पोलिसांना शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आहे, तर एका कर्मचाऱ्यावर आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नबील मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तो मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याच्या चर्चाही पोलिसांनी फेटाळून लावल्या आहेत. अद्याप त्याची चौकशी करण्यात आलेली नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला का केला, यामागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नबीलचा यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. २०२२ मध्ये दरियागंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात मारामारीसंदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलीस तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करत आहेत. यामध्ये जामा मशिद पोलीस ठाण्यात पोलिसांवर केलेला चाकूहल्ला, पळून जाताना दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेणे आणि त्यानंतर पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेला हल्ला या तीन प्रकरणांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा