30 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरक्राईमनामाकुर्ला हल्ला प्रकरणी ८-१० वयाची दोन मुले ताब्यात

कुर्ला हल्ला प्रकरणी ८-१० वयाची दोन मुले ताब्यात

डोंगरीच्या बाल सुधारगृहात रवानगी

Google News Follow

कुर्ला येथील एका नामांकित मॉलच्या आवारात फोटो काढत असलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करणाऱ्या मुस्लिम टोळीतील आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

या दोन्ही अल्पवयीन मुलांचे वय ८ ते १० असून या गुन्ह्यात विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.या गुन्हयात आठ विधिसंघर्ष बालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घाटकोपर पश्चिम येथील फिनिक्स मॉल जवळ असणाऱ्या स्व.प्रमोद महाजन गार्डन येथे शुक्रवारी दुपारी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे राहणारा सौरभ कुश्वाह (२१) हा विद्यार्थी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारी हे दोघेही खरेदीसाठी घाटकोपर पश्चिम येथील फिनिक्स मॉलमध्ये गेले होते. खरेदी आणि खाणे झाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास दोघे मॉलमधील ‘प्रमोद महाजन गार्डन’ परिसरात फोटो काढत होते.

हे ही वाचा:

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

भाग रहेमान भाग…

ड्रॉचा भारताला मोठा फटका; WTC फायनलची वाट खडतर!

याच वेळी तेथे सात ते आठ अल्पवयीन मुलांचे टोळके आले आणि त्यांनी दोघांनाही या जोडप्याला फोटो शूट करण्यास विरोध करून विनाकारण त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सौरभने याला विरोध केला असता, टोळक्यातील एकाने हातातील हॉकी स्टिकने त्याच्या पाठीत जोरात मारहाण केली, तर इतरांनी दोघांनाही लाथाबुक्क्यां नी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी शुक्रवारी रात्री आठ विधिसंघर्ष बालकांविरोधात गुन्हा दाखल करून १२ ते १५ वयोगटातील ६ जणांना अटक करण्यात आली होती. ८ ते १० वयोगटातील दोन मुले फरार होती. या दोघांना सोमवारी ताब्यात घेऊन बाल न्याय समिती समोर हजर करण्यात आले होते. या आठ ही जणांची दोन आठवड्यासाठी (४ डिसेंबर) डोंगरीच्या बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा