प्रभू श्री राम मंदिराची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे निधन झाले आहे. चौपाल हे माजी विधानपरिषद सदस्य, दलित नेते, श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे स्थायी सदस्य, विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्षही होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कामेश्वर चौपाल यांना संघाने पहिल्या कारसेवकाचा दर्जाही दिला.
बिहार भाजपाचे माजी आमदार कामेश्वर चौपाल यांचे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रासह बिहारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केले होते. सुरुवातीपासूनच त्यांची प्रतिमा अयोध्या राम मंदिरासाठी पूर्णपणे समर्पित असलेल्या व्यक्तीची होती.
दरम्यान, बिहार भाजपाने कामेश्वर चौपाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पक्षाने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून पोस्ट केले करत लिहिले आहे की, “राम मंदिराची पहिली वीट रचणारे, माजी विधानसभेचे सदस्य, दलित नेते, श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे स्थायी सदस्य, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीय अध्यक्ष कामेश्वर चौपाल यांच्या निधनाची बातमी ही एक सामाजिक हानी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. ते भारतमातेचे खरे सुपुत्र होते. देव त्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. बिहार भाजप परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली.”
राम मंदिर की पहली ईंट रखने वाले, पूर्व विधान पार्षद, दलित नेता, श्री राम जन्मभूमि ट्रस्ट के स्थाई सदस्य, विश्व हिंदू परिषद के प्रांतीय अध्यक्ष रहे, श्री कामेश्वर चौपाल जी के निधन की खबर सामाजिक क्षति है। उन्होंने सम्पूर्ण जीवन धार्मिक और सामाजिक कार्यों में समर्पित किया। मां… pic.twitter.com/95eci6fjDK
— BJP Bihar (@BJP4Bihar) February 7, 2025
हे ही वाचा :
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पाच वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात!
महाकुंभात सहभागी होण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही
युनूस सरकार म्हणतं, मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यासाठी शेख हसीनाचं जबाबदार
एलोन मस्कच्या DOGE टीममधील २२ वर्षीय आकाश बोब्बा कोण आहे?
कोण होते कामेश्वर चौपाल?
कामेश्वर चौपाल यांनी ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या पायाची पहिली ‘रामशिला’ (वीट) रचली. त्यावेळी ते विश्व हिंदू परिषदेचे (VHP) स्वयंसेवक होते. १९८९ मध्ये, जेव्हा राम मंदिरासाठी पहिली ‘रामशिला’ बसवण्यात येणार होती, तेव्हा कामेश्वर चौपाल यांची निवड करण्यात आली कारण ते राम मंदिर चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावत होते. १९९१ मध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडली आणि भाजपचे सदस्य झाले. पक्षाने त्यांना संसदीय निवडणूक लढवायला लावली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक हरले. पण, ते २००२ ते २०१४ पर्यंत दोनदा राज्यसभा सदस्य राहिले आहेत.