29 C
Mumbai
Saturday, August 22, 2026
घरस्पोर्ट्सतेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

यंदा कुणालाही खेलरत्न नाही

Google News Follow

Related

क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी २०२५ च्या अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत भारताचा स्टार ऍथलीट तेजस्विन शंकर याचे नाव आघाडीवर आहे. मात्र यंदा खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.

अर्जुन पुरस्काराच्या प्रतिष्ठेच्या यादीत विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, बॅडमिंटनपटू पुलेला गायत्री गोपीचंद, बुद्धिबळपटू विदित गुजराथी, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली, बॉक्सर नरेंद्र आणि कर्णबधिर नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

तेजस्विन शंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दशक्रीडेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. राष्ट्रकुल स्पर्धेतील दशक्रीडेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. याच कामगिरीची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने २०२५ मध्ये बटुमी, जॉर्जिया येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषकात विजेतेपद मिळवत भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला होता.

अर्जुन पुरस्कारविजेते

तेजस्विन शंकर – ऍथलेटिक्स

मोहम्मद अजमल व्ही. – ऍथलेटिक्स

प्रियांका गोस्वामी – ऍथलेटिक्स

ट्रीसा जॉली – बॅडमिंटन

पुलेला गायत्री गोपीचंद – बॅडमिंटन

नरेंद्र – बॉक्सिंग

विदित संतोष गुजराथी – बुद्धिबळ

दिव्या जितेंद्र देशमुख – बुद्धिबळ

धनुष श्रीकांत – कर्णबधिर नेमबाजी

लालरेमसियामी – हॉकी

राजकुमार पाल – हॉकी

सुरजीत – कबड्डी

पूजा – कबड्डी

रुद्रांश खंडेलवाल – पॅरा नेमबाजी

एकता भ्यान – पॅरा अॅथलेटिक्स

अरविंद सिंह – रोइंग

अखिल श्योराण – नेमबाजी

जीवनगौरवासाठी आय. अरुमैनायागम यांचा सन्मान

१९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य राहिलेले आय. अरुमैनायागम यांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे.

क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे विविध पुरस्कारांसाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची निवड करण्यात आली.

हे ही वाचा:

राजकारणाला सापशिडीचा डाव का म्हणतात? हे आहे उत्तर…

टेस्ट क्रिकेटमध्ये पंतचा ‘सिक्सर’ विक्रम; १०० षटकारांचा ऐतिहासिक टप्पा

बाहेर जेवताना सावधान! ‘या’ ४ गोष्टी तपासा; FDA आयुक्तांचा सल्ला

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा; उन्नती हुड्डाचे विजयी पदार्पण

द्रोणाचार्य पुरस्कारविजेते

परवीर सिंह – ऍथलेटिक्स

छोटे लाल यादव – बॉक्सिंग

नेहा नंदकुमार चव्हाण – नेमबाजी

जीवनगौरव श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार :

धर्मेंद्र सिंह यादव – बॉक्सिंग

वीरेंद्र कुमार – कुस्ती

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांना क्रीडा प्रोत्साहन आणि विकासासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला आहे.

यंदाच्या घोषणेत विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड झालेली नाही. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर होण्यास यंदा मोठा विलंब झाला. निवड समितीने सुमारे सहा महिन्यांपूर्वी आपल्या शिफारशी सादर केल्या होत्या. मात्र अंतिम मंजुरी देण्यापूर्वी अर्जुन पुरस्कारांच्या निवडीची पुन्हा छाननी करण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

या अतिरिक्त तपासणीचा उद्देश पुरस्कारांच्या प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवणे असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. एका ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त खेळाडूने पुरस्कारांच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पुरस्कारांची अधिकृत घोषणा न झाल्याने खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

२९ ऑगस्टची परंपरा बदलली

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचा पारंपरिक सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. पूर्वी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आणि महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचा दिवस असल्याने त्याच दिवशी पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा होती. मात्र २०२० मधील कोविड महामारीनंतर ही परंपरा बदलली. त्यानंतर ऑलिम्पिक आणि इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकानुसार पुरस्कार सोहळ्याच्या तारखेत बदल होत गेले. २०२५ मध्येही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पारंपरिक २९ ऑगस्टऐवजी १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा