31 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरलाइफस्टाइलबाहेर जेवताना सावधान! ‘या’ ४ गोष्टी तपासा; FDA आयुक्तांचा सल्ला

बाहेर जेवताना सावधान! ‘या’ ४ गोष्टी तपासा; FDA आयुक्तांचा सल्ला

आरोग्याची काळजी घेण्याचा तुकाराम मुंढेंचा संदेश

Google News Follow

Related

बाहेर जेवताना केवळ पदार्थाची चव आणि रेस्टॉरंटचा लूक पाहून निर्णय घेऊ नका, तर अन्नाची सुरक्षितता आणि स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व द्या, असा सल्ला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवण्यापूर्वी ग्राहकांनी चार महत्त्वाच्या गोष्टी तपासाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांच्या मते, सर्वप्रथम आपण नेमके किती आणि काय खात आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. केवळ आवडते म्हणून अतिरिक्त किंवा अनावश्यक पदार्थ खाण्याऐवजी शरीराला आवश्यक आणि पौष्टिक अन्नाला प्राधान्य द्यावे. चविष्ट पदार्थांपेक्षा आरोग्यासाठी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रेस्टॉरंटची स्वच्छता. ग्राहकांनी शक्य असल्यास परिसर, टेबल, भांडी आणि स्वयंपाकघराची स्वच्छता पाहावी. अस्वच्छ वातावरण, कीटकांचा वावर, अन्नाची चुकीची हाताळणी किंवा स्वच्छतेचा अभाव जाणवल्यास तेथील अन्न घेण्याबाबत सावध राहावे. राज्यात अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांवर अलीकडे कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राजकारणाला सापशिडीचा डाव का म्हणतात? हे आहे उत्तर…

हॉर्मुझवर ट्रम्प यांचा दावा; इराणचा जलमार्ग बंदच!

गॉल कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्स गरज

टेस्ट क्रिकेटमध्ये पंतचा ‘सिक्सर’ विक्रम; १०० षटकारांचा ऐतिहासिक टप्पा

तिसरे म्हणजे रेस्टॉरंटकडे आवश्यक अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी आहे का, हे तपासणे. ग्राहकांनी अधिकृत आणि नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांनाच प्राधान्य द्यावे, असे मुंढे यांनी सुचवले. चौथी आणि तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या वय आणि आरोग्याला अनुरूप अन्नाची निवड. प्रत्येक व्यक्तीची आहाराची गरज वेगळी असते. त्यामुळे केवळ आकर्षक दिसणारे किंवा चविष्ट पदार्थ न निवडता आपल्या शरीरासाठी योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. अन्नसुरक्षेची सुरुवात ग्राहकांच्या जागरूकतेपासून होते, असा संदेश मुंढे यांनी दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा