अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक आणि त्यांचे मित्र एलोन मस्क यांना त्यांच्या टीममध्ये स्थान देत त्यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसीची (DOGE) जबाबदारी दिली आहे. सरकारमधील नोकरशाही साफ करण्यापासून अनावश्यक खर्च कमी करणे, अनावश्यक नियम काढून टाकणे आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करणे या सर्व गोष्टींवर हा विभाग कम करणार आहे. दरम्यान, एलोन मस्क यांच्या नेतृत्वातील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीने (DOGE) सहा तरुण अभियंत्यांची त्यांच्या टीममध्ये नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या तरुणांना सरकारी कामकाजाचा अनुभव नसतानाही स्थान देण्यात आल्याने ही नियुक्ती चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच सहा तरुण अभियंत्यांपैकी एक नाव हे आकाश बोब्बा याचे आहे.
अभियंता आकाश बोब्बा हा भारतीय वंशाचा असून १९ ते २४ वयोगटातील या सहा अभियंत्यांना संवेदनशील सरकारी यंत्रणांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मस्क यांच्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून चिंताही व्यक्त केली जात आहे. सरकारी अनुभव नसताना उच्च सुरक्षा डेटा वापरण्यासाठी परवानगी मिळाली असल्याने त्यासंबंधी प्रश्न उपस्थित केले जात आहे. आकाश बोब्बाशिवाय पाच अन्य युवा अभियंत्यांना क्वालिफाइड गर्व्हमेंट सिस्टिमचा क्सेस मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
आकाश बोब्बा कोण आहे?
आकाश बोब्बा हा २२ वर्षीय तरुण भारतीय वंशाचा असून तो यूसी बर्कले येथील प्रतिष्ठित व्यवस्थापन, उद्योजकता आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाचा भाग होता. त्याने मेटा, पलांटीर आणि प्रसिद्ध हेज फंड ब्रिजवॉटर असोसिएट्ससह आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये इंटर्न म्हणून काम केलं आहे. तांत्रिक ज्ञानाव्यतिरिक्त, त्याच्याकडे बायोडेटा एआय, डेटा अॅनालिटिक्स आणि फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये कौशल्य आहे.
हे ही वाचा :
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
‘येशूच्या क्रोधाला घाबरा, देवांच्या मूर्ती तोडा’
खुसखुशीत शैलीत क्रिकेटचे विश्लेषण करणारे द्वारकानाथ संझगिरी गेले!
याशिवाय आकाश याचा महाविद्यालयातील एक किस्सा देखील चांगलाच चर्चेत आहे. त्याचा महाविद्यालयीन सहकारी चारिस झांग याने बर्कले विद्यापिठातील एक घटनेची आठवण सांगितली की, एका महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधी, आकाशच्या टीममधील एका सहकाऱ्याकडून चुकून त्यांचा संपूर्ण कोडबेस डिलिट झाला. त्यावेळी संपूर्ण टीम चिंतेत असताना आकाश याने प्रकल्प नीट करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याने प्रकल्पाचा संपूर्ण कोडबेस एका रात्रीत पुन्हा लिहिला आणि वेळेपूर्वी प्रकल्पही सादर केला. त्याच्या या कर्तुत्वामुळेच त्यांच्या टीमला उत्तम गुण मिळाले होते.