मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात गुरुवारी (६ फेब्रुवारी) नियमित सराव उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे लढाऊ मिराज २००० प्रशिक्षण विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. विमान एका शेतात कोसळले, त्यानंतर त्याला आग लागली. घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही वैमानिकांसह ग्वाल्हेरला रवाना झाले.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर जखमी पायलटचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे.
करैरा पोलिस स्टेशनचे प्रभारी विनोद छावई यांनी सांगितले की, विमानात दोन पायलट होते. अपघातापूर्वी दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले. दोघेही सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच, हवाई दलाचे पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही वैमानिकांना ग्वाल्हेरला घेऊन गेले.
हे ही वाचा :
‘येशूच्या क्रोधाला घाबरा, देवांच्या मूर्ती तोडा’
खुसखुशीत शैलीत क्रिकेटचे विश्लेषण करणारे द्वारकानाथ संझगिरी गेले!
हद्दपारी यापूर्वीही होती, बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशी घेणे ही जबाबदारी!