अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या काही भारतीयांना अमेरिकेने लष्करी विमानाने भारतात पाठवून दिले. यावेळी त्यांच्या हातात हातकडी असल्याची माहिती काही स्थलांतरितांनी दिली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर प्रथमच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना मायदेशात परत घेण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले.
राज्यसभेत बोलताना जयशंकर यांनी विरोधकांना आश्वासन दिले आहे की, परत येणाऱ्या निर्वासितांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाशी संपर्क साधत आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, हद्दपारीची कारवाई नवीन नाही. यापूर्वीही, इतर कोणत्याही देशात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवले जात असे. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये गतिशीलता आणि स्थलांतर खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. एक देश म्हणून, आम्ही कायदेशीररित्या स्थलांतर करणाऱ्यांना प्रोत्साहन देतो, पण कधीही बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही. जर आपले कोणतेही नागरिक बेकायदेशीरपणे दुसऱ्या कोणत्याही देशात गेले असतील तर तो देश त्यांच्या कायद्यानुसार त्यांना पकडतो आणि परत पाठवतो. ही प्रक्रिया नवीन नाही.
हे ही वाचा :
करुणा शर्मा नव्हे आता करुणा मुंडे, धनंजय मुंडेंनी पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश!
गुगलकडून नवीन फ्लॅगशिप एआय मॉडेल
नव्या आयकर विधेयकाला उद्या मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार !
एस जयशंकर यांनी सभागृहात सांगितले की, कोणत्याही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया २००९ पासून सुरू आहे. विमानाने लोकांना पाठवण्याची पद्धत २०१२ पासून सुरू आहे. ही बाब खासदारांना माहित असली पाहिजे. २००९ मध्ये ७४७ बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले. त्याचप्रमाणे, वर्षानुवर्षे शेकडो लोकांना परत पाठवण्यात आले. प्रत्येक देशात राष्ट्रीयत्व तपासले जाते. लष्करी विमानाने पाठवण्याचा नियम २०१२ पासून लागू आहे. याबाबत कोणताही भेदभाव नाही. जयशंकर यांनी हद्दपारीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कराराचाही उल्लेख केला. भारतीयांना कोणत्याही प्रकारचे अमानवी वागणूक मिळू नये म्हणून आम्ही हद्दपारीच्या मुद्द्यावर अमेरिकन सरकारशी सतत संपर्कात आहोत, असेही त्यांनी सांगितले.