छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून पुन्हा एकदा धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संबलपुरी गावातील पाद्री संतोष मोशे आणि त्यांची पत्नी अनु मोशे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती स्वतः एका पीडित व्यक्ती दिली. गरीब, बेरोजगार आणि महिलांना लक्ष्य करून त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याचा प्रकार सुरु असल्याचे पिडीत व्यक्तीने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार, संबलपुरी येथील रहिवासी उत्तरा कुमार साहू यांनी म्हटले आहे की त्यांना ख्रिश्चन व्हायचेही नाही परंतु पाद्री आणि त्यांची पत्नी सतत त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले, कुटुंबाला आणि सासरच्यांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केले आहे आणि आता ते माझ्या मागे लागले आहेत.
ते पुढे म्हणाले, पाद्री पती-पत्नी दोघे मिळून सर्वत्र ठिकाणी फिरतात आणि आजारी, असहाय्य, गरीब आणि दुर्बलांना लक्ष्य करून आमिष दाखवतात. त्यानंतर अशा लोकांना चर्चमध्ये बोलावले जाते, त्यांच्याकडून प्रार्थना करायला लावली जाते, त्यांच्या घरी सभा घेतल्या जातात आणि मदतीचे आश्वासन देवून त्यांचे धर्मांतर केले जाते.
हे ही वाचा :
हद्दपारी यापूर्वीही होती, बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशी घेणे ही जबाबदारी!
पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे धाडसी पाऊल
अमेरिकेतून आलेले स्थलांतरित भारतीय म्हणतात, आम्हाला एजंटने फसवले!
हमासने समलैंगिक सदस्यांना फाशी दिली, इस्रायली पुरुष बंधकांवरही झाले अत्याचार!
मंदिरात केली जाणारी पूजा कशी चुकीची आहे आणि प्रसाद घेणे म्हणजे ‘सैतान’ स्वीकारण्यासारखे आहे, अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात भरवल्या जातात. मग त्यांना देवाची मूर्ती तोडण्यास आणि देवी-देवतांच्या प्रतिमा असलेल्या टाइल्स उपटण्यास सांगितले जाते. जे लोक ख्रिश्चन धर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना येशूच्या क्रोधाला घाबरण्यास सांगितले जाते.
कोणीही त्यांचे विचार बदलू नयेत म्हणून, प्रार्थनेच्या नावाखाली त्यांना घरापासून दूर ठेवले जाते आणि सतत ब्रेनवॉश केले जाते. यासाठी त्यांना सुमारे ३-४ दिवस चर्चमध्ये ठेवले जाते त्यानंतर घरी पाठवले जाते. या काळात त्यांना चिकन आणि मटण दिले जाते, असे उत्तरा साहू यांनी म्हटले. या प्रकरणी उत्तरा साहू साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीविरुद्ध पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.