राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष, गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. संपूर्ण काँग्रेस आपली सर्व शक्ती एका कुटुंबाला समाधानी करण्यात खर्च करत असल्याचे पंतप्रधान मोदी राज्यसभेत म्हणाले. काँग्रेसचा ‘कुटुंब प्रथम’ हा मंत्र असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘काँग्रेसकडून ‘सबका साथ, सबका विकास’ अशी अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल. हे त्यांच्या विचारांच्या, समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते त्यांच्या रोडमॅपमध्येही बसत नाही. एवढी मोठी पार्टी एकाच कुटुंबाला समर्पित झाली आहे, त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ हे त्यांच्यासाठी शक्य नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान इथेच थांबले नाहीत, त्यांनी तीव्र हल्ला केला आणि म्हणाले की काँग्रेसने कुटुंब प्रथमचे धोरण स्वीकारले आहे. ‘काँग्रेसने राजकारणाचे असे मॉडेल तयार केले होते, ज्यामध्ये खोटेपणा, कपट, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे मिश्रण होते. काँग्रेस मॉडेलमध्ये कुटुंब प्रथम हे सर्वात महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा :
एलोन मस्कच्या DOGE टीममधील २२ वर्षीय आकाश बोब्बा कोण आहे?
हद्दपार केलेल्या भारतीयांसाठी सरकारने विमान का पाठवले नाही?
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात कवी मजरूह सुलतानपुरी आणि अभिनेते बलराज साहनी यांच्या अटकेचा आणि दूरदर्शनवर देव आनंद यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याचा उल्लेख करून काँग्रेसवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून हल्ला चढवला. ते म्हणाले, “संविधान” हा शब्द काँग्रेसला शोभत नाही कारण आणीबाणीच्या काळात देशातील प्रमुख नेते आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधींना बेड्या ठोकल्या होत्या.
तत्कालीन जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारने लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्यावर कविता वाचल्याबद्दल ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) वरून कसे काढून टाकले होते, हे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने “तुष्टीकरण” ऐवजी “संतुष्टीकरणा’चा (समाधान) मार्ग निवडला असल्याचे म्हटले. पंतप्रधान पुढे म्हणाले, सत्तेसाठी आणि राजघराण्याच्या (गांधी कुटुंबाच्या) अहंकारासाठी या देशातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त करण्यात आली होती, देशाला तुरुंगात रूपांतरित केले गेले होते.