बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळून आला असून समाजकंटकांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) बांगलादेशला स्वातंत्र्य देणाऱ्या शेख मुजीबुर रहमान यांचे घर जाळून टाकले. यानंतर बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने देशातील तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी या घटनांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जबाबदार ठरवले आहे. शेख हसीना यांनी भारतातून केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे निदर्शकांनी आक्रमक होत मुजीबुर रहमान यांच्या ढाका येथील घराला लावली.
युनूस सरकारच्या प्रेस विंगने म्हटले आहे की, “३२ धनमोंडी येथील निवासस्थानाची केलेली तोडफोड अनपेक्षित आणि अनावश्यक होती परंतु, भारतात पळून गेलेल्या शेख हसीना यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर या घटनेत झाले.” पुढे असेही म्हणण्यात आले आहे की, हसीना शेख ज्या ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशातून पळून गेल्यापासून भारतात राहत आहेत, ज्या त्यांचे १६ वर्षांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निषेधानंतर देश सोडून गेल्या होत्या, त्या सत्तेत असताना ज्या स्वरात बोलत होत्या त्याच स्वरात त्या सर्वांना धमक्या देत आहेत. प्रेस विंगने पुढे म्हटले आहे की, अंतरिम सरकार काही लोक आणि गट देशभरातील विविध संस्था आणि आस्थापनांची तोडफोड आणि त्यांना आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल चिंतीत असून निरीक्षण करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
बुधवारी, शेख हसीना यांनी त्यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांना युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारविरुद्ध निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी यावेळी असे म्हटले की, विद्यार्थी आंदोलन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी रचण्यात आले होते. मोहम्मद युनूस यांनी त्यांना आणि त्यांच्या बहिणीला मारण्याची काटेकोर योजना आखली होती, असे त्यांनी जाहीर केले आणि नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तीला कथित कटात प्रमुख आरोपी म्हणून उभे केले. त्यांचे हे विधान अंतरिम सरकारच्या समर्थकांना पसंत पडले नाही आणि त्याचवेळी समर्थकांनी मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाला आग लावली. मुजीबुर यांनी अनेक दशके त्यांचे नेतृत्व या निवासस्थानावरून केले होते. हसीना यांच्या कारकिर्दीत, ते एका संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले होते जिथे राज्याचे प्रमुख किंवा मान्यवर राज्य प्रोटोकॉलनुसार भेट देत असत.
हे ही वाचा:
मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे धाडसी पाऊल
करुणा शर्मा नव्हे आता करुणा मुंडे, धनंजय मुंडेंनी पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश!
दरम्यान, बांगलादेश सरकारने गुरुवारी भारतात राहून हसीनाच्या कारवायांविरुद्ध औपचारिक निषेध नोंदवला आणि ढाका येथील देशाच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना निषेध पत्र सुपूर्द केले. गुरुवारी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मुजीबुर रहमान यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला.