28.3 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरविशेषमूक योद्ध्याची शौर्यगाथा! ‘टायसन’चा स्वातंत्र्यदिनी सन्मान

मूक योद्ध्याची शौर्यगाथा! ‘टायसन’चा स्वातंत्र्यदिनी सन्मान

गोळी लागली तरी दहशतवाद्यांचा माग काढत राहिला

Google News Follow

Related

देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा सन्मान होत असतानाच भारतीय लष्करातील एका शूर योद्ध्याचंही नाव विशेष चर्चेत आलं आहे. ‘टायसन’ या लष्करी श्वानाला दहशतवादविरोधी कारवाईतील धाडसी योगदानासाठी ‘उल्लेखनीय कामगिरीची अधिकृत नोंद’ (Mention-in-Despatches) हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. टायसन हा २ पॅरा विशेष दलासोबत तैनात होता. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान टायसनला एका संशयित ठिकाणी दहशतवाद्यांची उपस्थिती शोधण्यासाठी पुढे पाठवण्यात आलं होतं. धोक्याची पर्वा न करता टायसन पुढे गेला आणि दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात सुरक्षा दलांना मदत केली.

या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि टायसन गंभीर जखमी झाला. मात्र, जखमी होऊनही त्याने बजावलेल्या भूमिकेमुळे सुरक्षा दलांना कारवाई पुढे नेण्यात मदत झाली. त्याच्या या धाडसाची दखल घेत त्याला ‘उल्लेखनीय कामगिरीची अधिकृत नोंद’ हा लष्करी सन्मान देण्यात आला आहे. हा सन्मान युद्ध किंवा लष्करी कारवाईदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या योगदानाची अधिकृत नोंद म्हणून दिला जातो.

भारतीय लष्करातील प्रशिक्षित श्वानांचा वापर दहशतवादविरोधी कारवाया, स्फोटकांचा शोध, माग काढणे, सुरक्षा तसेच शोध आणि बचाव मोहिमांमध्ये केला जातो. अतिशय धोकादायक भागांमध्ये जवानांपूर्वी पुढे जाऊन धोका ओळखण्याची त्यांची क्षमता महत्त्वाची ठरते.

हे ही वाचा:

एकाच फ्लाइट नंबरची दोन विमानं आमनेसामने; अमेरिकेत नेमके काय झाले?

चीनच्या बाजारात भारतीय वस्तूंची मागणी वाढली

‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक

मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सन्मानांमध्ये ७८ शौर्य पुरस्कारांसोबत ८९ ‘उल्लेखनीय कामगिरीच्या अधिकृत नोंदी’ मंजूर करण्यात आल्या आहेत. या सन्मानांमधून देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कारवाईत योगदान देणाऱ्या जवानांसोबतच लष्करी श्वानांसारख्या ‘मूक योद्ध्यांच्या’ भूमिकेलाही अधोरेखित करण्यात आलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा