30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरक्राईमनामाएटीएम यंत्रावर बनावट बॉक्स बसवून ६ हजारांची फसवणूक

एटीएम यंत्रावर बनावट बॉक्स बसवून ६ हजारांची फसवणूक

वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

Google News Follow

एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येण्याच्या जागेवर (कॅश डिस्पेन्सिंग स्लॉट) हुबेहूब मशीनच्या रंगाचा बनावट बॉक्स बसवून ग्राहकांचे पैसे लांबवणाऱ्या अज्ञात भामट्यांविरोधात वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पश्चिम येथील हिल रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

बँक ऑफ बडोदाच्या हिल रोड शाखेचे मुख्य व्यवस्थापक चंद्रकेतू मुलदेव प्रसाद (४१) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर आणि १४ नोव्हेंबर या दोन दिवशी हा प्रकार घडला. १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका खातेदाराने एटीएममधून सहा हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश आला; मात्र मशीनमधून रोख रक्कम बाहेर आली नाही. या खातेदाराने बँकेकडे तक्रार केल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयाने संबंधित शाखेला ई-मेलद्वारे याबाबत कळवले.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

त्यानंतर बँक प्रशासनाने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार उघडकीस आला. १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत नारंगी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला सुमारे २७ वर्षीय तरुण एटीएममधील पैसे बाहेर येण्याच्या भागावर बनावट बॉक्स बसवताना दिसला. ग्राहकाने पैसे काढल्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा समज करून तो निघून गेल्यावर, संबंधित तरुणाने पुन्हा केंद्रात येऊन तो बॉक्स काढला आणि त्यात अडकलेले सहा हजार रुपये चोरून नेले.

असाच प्रकार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०९ ते रात्री ८.१० या वेळेतही घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. यावेळी निळ्या रंगाची जीन्स आणि पूर्ण बाह्यांचा शर्ट घातलेला सुमारे २६ वर्षीय दुसरा तरुण अशाच प्रकारे बनावट बॉक्स बसवून ग्राहकांची दिशाभूल करताना आढळला. या दोन्ही संशयित आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा