महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल देत बहुमताचे सरकार स्थापन झाले. दुसरीकडे विरोधातील महाविकास आघाडी सरकारने निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीकडून मतदारांच्या वाढलेल्या संख्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील माहितीचा आम्ही सखोल अभ्यास केला असून मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न तपासला आहे. मात्र, यात तफावत असल्याचे लक्षात येत आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान २०२४ मध्ये ३२ लाख मतदार जोडले गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकांमधील पाच महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख मतदार जोडले गेले. तर, हे ३९ लाख मतदार कोण आहेत? ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
काँग्रेसला लोकसभेत १.३६ लाख आणि विधानसभेत १.३४ लाख मतं मिळाली. पण या काळात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला. भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातलं नसून हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
महाकुंभ परिसरात तिसऱ्यांदा आगीची घटना!
अलास्कातील विमान रडारवरून अचानक गायब, १० बेपत्ता
काही मतदारांची नावे वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं असता त्यावर उत्तर आलेले नाही. महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही विचारत आहोत. हे मतदार वाढले कसे? निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नसून तुमची आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
निवडणूक आयोगावर आरोप करत नसून आयोगाने लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह उपलब्ध करून द्यावी. निवडणूक आयोग आम्हाला यादी देत नाही. त्यांची जबाबदारी आहे. लोकसभा आणि विधानसभेची यादी आम्हाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.