मालकीची जमीन गहाण ठेवली, बँकेतून कर्ज घेतलं आणि म्हशीही विकल्या, पंजाबमधील एका कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी त्यांची आयुष्यभराची संपूर्ण कमाई गमावली. पंजाब सरकारचे अधिकारी सीमा बेकायदेशीरपणे कशा ओलांडल्या जातात माहिती आणि पद्धती शोधण्यासाठी राज्यभर फिरत असताना, दुबई हे ‘डंकी मार्गां’नी (Donkey Routes) मेक्सिकोमार्गे अमेरिकेत जाणाऱ्या एजंट्सचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबमध्ये दुबईतील एजंट्सशी काही लोक जोडलेले आहेत जे लोकांना या एजंट्सशी संपर्क करून देतात.
आकाशदीप सिंग या २३ वर्षीय तरुणाने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याच्या कुटुंबाने त्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी म्हणून दुबईतील अशोक नावाच्या एका एजंटला ४५ लाख रुपये दिले. पंजाबमधील एका कौटुंबिक मित्राद्वारे एजंटशी करार केल्यानंतर आकाशदीप गेल्या वर्षी ६ जुलै रोजी पहिल्यांदा टूरिस्ट व्हिसावर दुबईला गेला. पुढे तो अमेरिकेसाठी निघाला आणि २४ जानेवारी रोजी सीमा ओलांडताना त्याला पकडण्यात आले.
दुबईला पोहोचल्यानंतर, आकाशदीपचा अमेरिकेला जाणारा सहा महिन्यांचा भयावह असा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासात त्याला ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा, होंडुरास, ग्वाटेमाला आणि मेक्सिको येथे घेऊन गेला. दुबईहून अमेरिकेला जाणारा हा डंकी मार्ग आहे. पुढे अमेरिकन सीमा अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. आकाशदीप याची आई दलजित कौर म्हणाल्या की, “आम्ही ६ कनाल जमीन विकली, २ एकर गहाण ठेवले आणि पैशांची व्यवस्था करण्यासाठी आमचा ट्रॅक्टर, कापणी यंत्र आणि म्हशीही विकल्या. पण, आकाशदीप सीमेवरील भिंत ओलांडताना पकडला गेला.” आकाशदीप हा अशा अनेकांपैकी एक तरुण आहे ज्यांनी अमेरिकन स्वप्नासाठी आपलं सर्वकाही धोक्यात घातले, पण ते स्वप्न भंग झाले.
आणखी एका निर्वासित व्यक्तीने सांगितले की, “मला सांगण्यात आले होते की मला कायदेशीररित्या पाठवले जाईल, परंतु मला डंकी मार्गाने पाठवण्यात आले. आठ महिने तिथे पोहचायला लागले. पुढे अटक झाली, मला २० दिवसांसाठी अमेरिकन सीमेवर तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर परत पाठवण्यात आले. आमचे हातपाय साखळ्यांनी बांधले गेले. लहान मुले वगळता सर्वांना साखळ्यांनी बांधले गेले. अमृतसर विमानतळावर पोहोचण्यासाठी आम्हाला ४० तास लागले.” पुढे त्याने म्हटले की, आता मी भारतात परत आलो आहे, मी येथे काम करेन. शेती करेन. पैसे परत मिळवण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो.
हे ही वाचा :
मनोरुग्णाच्या हल्ल्यात पोलीस अंमलदार जखमी, सेल्फी पॉईंटवरील घटना!
लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार कसे जोडले गेले?
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
होशियारपूरच्या ताहली येथील हरविंदर सिंग म्हणाले की, त्यांनी एका माणसाला समुद्रात बुडताना पाहिले आणि दुसऱ्याला दरीत पडून मरताना पाहिले. आजारी आणि जखमींना मागे सोडण्याची पद्धत होती. पनामाच्या जंगलातून जाताना त्यांनी मृतदेह पाहिले.
पंजाब सरकार आर्थिक संकटात असलेल्या निर्वासितांसाठी त्यांना विविध कौशल्य विकासाच्या संधींबद्दल सल्ला देण्याची योजना आखत आहे ज्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकेल. तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आणि इच्छुक उमेदवारांना सैन्यात भरतीसाठी अर्ज करायला लावणे यावर चर्चा करण्याची योजना आखत आहे.