दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर असताना दिल्लीमधील घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आप पक्षाच्या आमदारांना लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे चौकशी आदेश जारी करण्यात आले आहेत.
भाजपकडून फोन आल्याबद्दल आणि १५ कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याबद्दल आप नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या आदेशानंतर, एसीबीची पथके आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आली आहेत. आपचे कायदेशीर कक्षाचे अध्यक्ष संजीव नसियार म्हणाले की, एसीबी पथक कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा सूचनांशिवाय अर्ध्या तासाहून अधिक काळ केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर बसले होते. तसेच त्यांनी भाजप पक्षावर टीका केली आणि म्हटले की, राजकीय नाटक घडवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहून अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी आपच्या सात विद्यमान आमदारांना १५ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आणि एफआयआर नोंदवण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि इतर कोणत्याही तपास संस्थेला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :
महाराष्ट्रातील वाढलेले ३९ लाख मतदार आता बिहारमध्ये जातील!
अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!
अमेरिकेला पाठवण्यासाठी कुटुंबाने जमीन गहाण ठेवली, ट्रॅक्टर, म्हशी विकल्या आणि …
चेंबूर माहुल गाव येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
गुरुवारी केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपने त्यांच्या पक्षाच्या १६ उमेदवारांना आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्यासाठी बोलावले होते. ते म्हणाले होते की, आमच्या १६ उमेदवारांना असे फोन आले आहेत की जर त्यांनी आप सोडून भाजपामध्ये प्रवेश केला तर ते त्यांना मंत्री बनवतील आणि १५ कोटी रुपये देतील.