30.4 C
Mumbai
Saturday, May 16, 2026
घरस्पोर्ट्सअंपायरशी वाद, अभद्र भाषेमुळे पोलार्डला दंड!

अंपायरशी वाद, अभद्र भाषेमुळे पोलार्डला दंड!

Google News Follow

Related

मुंबई इंडियन्सचे बॅटिंग कोच आणि माजी धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड अडचणीत सापडले आहेत. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अंपायरशी वाद घालत अभद्र भाषा वापरल्याप्रकरणी आयपीएल प्रशासनाने पोलार्डवर कारवाई केली आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पोलार्डच्या मॅच फीपैकी १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली असून त्यांच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा करण्यात आला आहे.

ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील १९व्या षटकात घडली. त्यावेळी पोलार्ड चौथ्या अंपायरशी जोरदार वाद घालताना दिसले. या वादादरम्यान त्यांनी अभद्र भाषा वापरल्याचे समोर आले. त्यामुळे आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल २.३ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले.

आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,
“मुंबई इंडियन्सचे बॅटिंग कोच किरोन पोलार्ड यांनी सामन्यादरम्यान अभद्र भाषा वापरून आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर मॅच फीच्या १५ टक्के दंडासह एक डिमेरिट पॉइंटची कारवाई करण्यात आली आहे. पोलार्ड यांनी आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरी पंकज धर्माणी यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.”

दरम्यान, धर्मशाळामध्ये झालेल्या या हायस्कोअरिंग सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० षटकांत ८ बाद २०० धावा उभारल्या. प्रभसिमरन सिंगने ५७ धावांची दमदार खेळी केली. मात्र, मुंबईकडून तिलक वर्माने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईने २०१ धावांचे लक्ष्य ४ विकेट्स गमावून सहज पार केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा