महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता तीन-चार महिने लोटल्यानंतरही त्या पराभवातून महाविकास आघाडी सावरलेली नाही. या पराभवाला ईव्हीएम, निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टीका ते सातत्याने करत असतात. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका केली. सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेदेखील होत्या.
त्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘एकही चुटकुला बार बार सुनाया जाए तो उसपर हसां नहीं करते’. ते म्हणाले, या आरोपांवर यापूर्वीच निवडणुक आयोगाने उत्तर दिलेले आहे. किती मतदार वाढले, कुठे मतदार वाढले, कसे मतदान झाले आहे, हे सर्व आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
महाकुंभ परिसरात तिसऱ्यांदा आगीची घटना!
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
फडणवीसांनी पुढे सांगितले की, नवी दिल्लीत होणाऱ्या पराभवाला झाकण्यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार आहे. त्यामुळे काऊंटर फायर करण्याचा राहुल गांधी यांचा हा प्रयत्न आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नामोनिशाण मिटणार आहे. त्यांनी काँग्रेसच्या होणाऱ्या पराभवाचे आत्मपरिक्षण करावे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात भाजपला १३२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ तर शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या होत्या. महायुतीने एकूण २३७ जागी दणदणीत यश मिळविले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षाला २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १० तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या.