30 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरदेश दुनिया“भारताला एका सहीवर तेल मिळतं, पाकिस्तानला नाही!”

“भारताला एका सहीवर तेल मिळतं, पाकिस्तानला नाही!”

भारताशी तुलना करत पाकिस्तानवरील ऊर्जा संकटासंबंधी मंत्र्याची कबुली

Google News Follow

Related

इराण-अमेरिका संघर्षामध्ये मध्यस्थीची भूमिका पार पाडणाऱ्या पाकिस्तानसमोर आता गंभीर असे ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी पाकिस्तानच्या इंधन साठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘समा टीव्ही’च्या ‘नदीम मलिक लाईव्ह’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी इशारा दिला की, देशाकडे केवळ पाच ते सात दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा शिल्लक आहे. पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि लाल समुद्रातील संकटामुळे पाकिस्तानची पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जर येत्या काही दिवसांत तेलाचा नवीन साठा आला नाही, तर देशातील वाहतूक आणि उद्योग पूर्णपणे ठप्प होऊ शकतात. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या मर्यादित धोरणात्मक साठ्यावर (Strategic Reserves) प्रकाश टाकला आणि तातडीने ‘ऊर्जा सुरक्षा नियोजना’ची गरज असल्याचं सांगितलं.

मुलाखतीदरम्यान पेट्रोलियम मंत्र्यांनी खुलासा केला की, पाकिस्तानकडे सध्या कच्च्या तेलाचा केवळ ५ ते ७ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यांच्या मते, ही परिस्थिती साठवणूक क्षमता वाढवण्याची आणि दीर्घकालीन ऊर्जा सज्जतेमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते. मलिक यांनी भारताच्या सामरिक क्षमतांचा संदर्भ देत आपली असहाय्यता व्यक्त केली. परिस्थितीची तुलना करताना ते म्हणाले की, पाकिस्तान भारताइतका सक्षम नाही. भारत एकाच सहीने आपल्या साठ्यातून ६०-७० दिवसांचा तेलसाठा मुक्त करू शकतो. मात्र, पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की, बाह्य धक्के सहन करण्याची त्याच्यात किंचितही क्षमता नाही.

अली परवेझ मलिक यांनी सांगितले की, देशाकडे एका दिवसासाठीही पुरेसा अतिरिक्त पेट्रोलचा साठा नाही. त्यांनी या संकटासाठी इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाला जबाबदार धरले. त्यांच्या मते, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवता न येण्यासारखे दिसत असून, त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, पाकिस्तानला तातडीने एका प्रभावी ऊर्जा सुरक्षा योजनेची गरज आहे.

हे ही वाचा:

बदमाशी केलीत, तर कायद्याचा दंडुका… बंगालमधील पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब

सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

दाऊदचा निकटवर्ती डोला भारतात आला!

इतिहासात दुबई क्रूडच्या किमती कधीही १७० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या नव्हत्या, जे जागतिक बाजारपेठेतील तीव्र अस्थिरतेचे लक्षण आहे. ते म्हणाले की, सरकार जनतेचे हाल कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शक्य तिथे सबसिडी (अनुदान) देण्याचा प्रयत्न केला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेमध्येही पेट्रोलची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा