अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १०४ भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प सरकारने नुकतेच हद्दपार करत भारताच्या हवाली केले. याच दरम्यान, याबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतून भारतीयांची ४८७ जणांची आणखी एक तुकडी लवकरच भारतात दाखल होणार आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, अमेरिकेने आणखी ४८७ भारतीय नागरिकांची ओळख पटवली आहे, जे तिथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. ते पुढे म्हणाले, अमेरिकेने नवी दिल्लीला ‘४८७ गृहीत धरलेल्या भारतीय नागरिकांबद्दल’ सूचित केले आहे, ज्यांना देशाबाहेर काढण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
फडणवीस राहुलना म्हणाले, एकही चुटकुला बार बार सुनाया…
पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!
जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!
महाराष्ट्रातील वाढलेले ३९ लाख मतदार आता बिहारमध्ये जातील!
परराष्ट्र सचिवांनी असेही सूचित केले की अधिक तपशील समोर येताच ही संख्या वाढू शकते, परंतु इतर व्यक्तींबद्दलची विशिष्ट माहिती अद्याप अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांवरील “अमानवीय वागणुकीच्या” मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आणि भारत सरकार हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करेल, असे सांगितले.