काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असलेल्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत, शुक्रवारी कोलंबियात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानातील मृतांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियन सरकारच्या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
कोलंबियन सरकारने ज्या प्रकारे पाकिस्तानातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला, त्या बद्दल आम्हाला थोडी निराशा झाली. त्यांनी दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्या निष्पाप लोकांबद्दल सहवेदना व्यक्त करायला हव्या होत्या, असे थरूर म्हणाले.
थरूर पुढे म्हणाले, आम्ही कोलंबियामधील आमच्या मित्रांना सांगू इच्छितो की, जो दहशतवादाचा प्रसार करतो आणि जो त्याचा प्रतिकार करतो, त्यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. आमची कारवाई ही स्वसंरक्षणासाठी होती. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने काश्मीरमधील पहलगाम येथे नागरिकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई केली, ज्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाच्या उपगटाने घेतली होती.
जसे कोलंबियाने अनेक दहशतवादी हल्ले सहन केले, तसाच अनुभव भारतालाही आहे – जवळपास चार दशके आम्ही हे सहन करत आलो आहोत, असे थरूर म्हणाले.
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर दबाव आणा
थरूर यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की, *”ज्या देशांमध्ये दहशतवाद्यांना आश्रय आणि संरक्षण दिले जाते, त्यांच्यावर कठोर दबाव आणणे आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेत किंवा त्याबाहेर, हे काम महत्त्वाचे आहे.”
हे ही वाचा:
अंधारे रातो मे सुनसान राहो पर !
शेतकऱ्याच्या मुलाने एनडीए प्रशिक्षणात टॉपर
बहुचर्चित अंकिता हत्याकांडाचा निकाल आज
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
अमेरिकेच्या मध्यस्थीच्या चर्चांवर प्रतिक्रिया
थरूर यांनी स्पष्ट केले की, *भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात कोणतीही औपचारिक मध्यस्थी प्रक्रिया झालेली नाही. अनेक देश – अमेरिका, फ्रान्स, यूएई, सौदी अरेबिया – यांच्याकडून आम्हाला फोन आले. पण आमचा संदेश स्पष्ट होता – आम्हाला युद्ध नको आहे. ही कारवाई फक्त दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी होती. ते थांबले, तर आम्हीही थांबू, असे ते म्हणाले. ७ मेच्या रात्री जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई झाली, तेव्हापासूनच आम्ही हे स्पष्ट केले आहे की भारत युद्ध सुरू करणार नाही. आम्ही या संघर्षात आक्रमक नाही, अशी टिप्पणीही थरूर यांनी केली.
ऑपरेशन सिंदूर’ नव्हे, तर पहलगाम हल्ल्यामुळे संघर्ष
शशी थरूर हे सध्या गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिका या देशांच्या दौर्यावर आहेत. त्यांचा उद्देश जगाला पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला संबंध उघड करण्यासाठी सध्या भारतीय खासदार विविध देशांत गेलेले आहेत. त्यातील या दौऱ्यात थरूर यांचा समावेश आहे. हा संघर्ष ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे नव्हे, तर पहलगाम हल्ल्यामुळे सुरू झाला, हे आम्ही जगाला सांगत आहोत,असे थरूर यांनी ठामपणे सांगितले.
