स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वेगळेच नाट्य रंगले. तिथे गायल्या गेलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीतावेळी सोनिया गांधी संतापलेल्या दिसल्या आणि त्यांनी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना झापल्याचे दिसत होते. त्यामागे कोणते कारण आहे, याची चर्चा रंगली
वंदे मातरम हे गीत आता संपूर्णच (सहा कडवी) गायले जायला हवे असा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेसच्या मुख्यालयात ते गीत पूर्णपणे वाजवले गेले. मात्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना ते आवडले नाही, असे व्हीडिओतून दिसत होते. ते गाणे थांबवावे असे त्या वारंवार सांगत होत्या. खर्गेंशीही त्यांचा संवाद झाल्याचे दिसत होते. राहुल गांधी हे त्यांच्यापासून थोडे लांब उभे असल्यामुळे ते यात फारसे काही बोलले नाहीत. मात्र ते गाणे थांबवावे असे ते सूचित करत होते. त्यांच्यासमोर काही अंतरावर त्यांचे पीए तसेच काँग्रेसचे कार्यकर्तेही उभे होते. तेव्हा राहुल यांच्या पीएने त्यांना हे गीत तीन मिनिटे गायले जाते असे इशाऱ्याने सांगितल्याचेही व्हीडिओत दिसत होते.
हे ही वाचा:
इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
शिराळ्यात नागपंचमीला ४१ नागांच्या प्रदर्शनास मान्यता
रिलायन्स–रोल्स रॉईसची मोठी ‘जेट इंजिन’ डील
‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक
यावर काँग्रेसचे खासदार मनोज कुमार यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले की, वंदे मातरम या गीताची केवळ दोन कडवी गाण्याची काँग्रेसची परंपरा आहे. त्याप्रमाणे ते गीत दोन कडवीच गायले गेले. सोनिया गांधी यांच्या भूमिकेचे मनोज कुमार यांनी समर्थन केले. काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनीही सोनिया गांधी यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिले की, १९३७च्या काँग्रेसच्या बैठकीत म्हटले की, रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काही कडवीच गायली जातील. पण इथे मात्र खर्गे यांना बसण्यासाठी खुर्ची देण्याकरिता सोनिया गांधी सांगत होत्या.
