काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याच्या आरोपांनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. काँग्रेससह इंडी आघाडीतील बहुतांश सदस्य पक्षांनी सोनिया गांधींचे समर्थन केले आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात कुठे संपूर्ण वंदे मातरम गायले जात आहे तर कुठे अर्धे. केरळमध्ये ते गायलेच गेले नाही. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचलमध्ये संपूर्ण गायले गेले हे कसे काय? असे कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे.
माकपचे महासचिव एम.ए. बेबी यांनी सांगितले की, राष्ट्रगीताच्या संपूर्ण आवृत्तीच्या गायनाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे आणि काँग्रेसने यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशात सध्या काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत.
हे ही वाचा:
मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद
बांगलादेशाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया करणार संघबदल
आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये असणार ५४००mAh बॅटरी, ४८MP कॅमेरा?
मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद
ते म्हणाले की, केरळमध्ये मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांच्या उपस्थितीत झालेल्या ध्वजारोहण समारंभात केवळ राष्ट्रगीत वाजवण्यात आले. वंदे मातरम् वाजवण्यात आले नाही. तर काँग्रेसशासित तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये वंदे मातरम् ची संपूर्ण आवृत्ती वाजवण्यात आली. त्यामुळे वंदे मातरम् गायनाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे, हे काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केले पाहिजे.
