28 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरराजकारणसोनियांवरून माकपने काँग्रेसला विचारला जाब

सोनियांवरून माकपने काँग्रेसला विचारला जाब

Google News Follow

Related

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याच्या आरोपांनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. काँग्रेससह इंडी आघाडीतील बहुतांश सदस्य पक्षांनी सोनिया गांधींचे समर्थन केले आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात कुठे संपूर्ण वंदे मातरम गायले जात आहे तर कुठे अर्धे. केरळमध्ये ते गायलेच गेले नाही. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचलमध्ये संपूर्ण गायले गेले हे कसे काय? असे कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे.

माकपचे महासचिव एम.ए. बेबी यांनी सांगितले की, राष्ट्रगीताच्या संपूर्ण आवृत्तीच्या गायनाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे आणि काँग्रेसने यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशात सध्या काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत.

हे ही वाचा:

मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद

बांगलादेशाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया करणार संघबदल

आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये असणार ५४००mAh बॅटरी, ४८MP कॅमेरा?

मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद

ते म्हणाले की, केरळमध्ये मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांच्या उपस्थितीत झालेल्या ध्वजारोहण समारंभात केवळ राष्ट्रगीत वाजवण्यात आले. वंदे मातरम् वाजवण्यात आले नाही. तर काँग्रेसशासित तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये वंदे मातरम् ची संपूर्ण आवृत्ती वाजवण्यात आली. त्यामुळे वंदे मातरम् गायनाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे, हे काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केले पाहिजे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा