चीनने भारताच्या २ हजार चौ. किमी भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. कोर्टाने म्हटले की, “खरा भारतीय असा आरोप करणार नाही.” मात्र, या विधानाशी संबंधित बदनामी प्रकरणातील कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
२०२३ मधील ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान राहुल गांधींनी दावा केला होता की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की चीनने भारताच्या २००० चौरस किमी क्षेत्रावर कब्जा केला आहे.
या विधानावरून उत्तर प्रदेशातील उदय शंकर श्रीवास्तव यांनी राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता.
सुप्रीम कोर्टाने सोमवारी (4 ऑगस्ट 2025) या प्रकरणावर सुनावणी घेतली.
न्यायालय काय म्हणाले
२००० किमी जमीन चीनने व्यापल्याचे तुम्हाला कसे कळले?”, असा सवाल न्यायालयाने केला. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने विचारले, “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग अशा गोष्टी का बोलता? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारत नाही?” न्यायालय म्हणाले की, जो खरा भारतीय आहे तो असे विधान करणार नाही.
हे ही वाचा:
येमेनमध्ये बोट बुडाल्याने ६८ निर्वासितांचा मृत्यू!
ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?
ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?
शेवटच्या सोमवारी बाबा विश्वनाथांचा भव्य रुद्राक्ष शृंगार
राहुल गांधींचा बचाव
राहुल गांधींनी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु ती फेटाळण्यात आली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना दावा केला की, “हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आले आहे.”
कोर्टाने राहुल गांधींविरोधातील फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे, परंतु त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
