बंगालमध्ये बदलाची हवा; टीएमसीचा ‘जंगलराज’ संपणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ममता बँनर्जीवर जोरदार टीका

बंगालमध्ये बदलाची हवा; टीएमसीचा ‘जंगलराज’ संपणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका करताना राज्यात “बदलाची हवा” असल्याचा दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील सभेत बोलताना त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर निशाणा साधला. टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये “जंगलराज” असल्याची टीका करत हा काळ लवकरच संपेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून भ्रष्टाचार, हिंसाचार आणि राजकीय दबावामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी या बाबतीत राज्य मागे पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोक आता या स्थितीला कंटाळले आहेत आणि बदल हवा आहे, असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
झारखंडमधील भीषण अपघातात ५ ठार, २५ जखमी

गाझासाठी शांतता मंडळ, १ अब्ज डॉलर भरा कायमचे सदस्य व्हा!

फुटपाथवर भाजी विकणाऱ्या सावंत मावशीचा मुलगा झाला सीआरपीएफचा जवान

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

पंतप्रधानांनी “डबल इंजिन सरकार” संकल्पनेवर भर दिला. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकासाला गती मिळते, असे सांगत त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. भाजप सत्तेत आल्यास केंद्र सरकारच्या योजना थेट राज्यातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि विकासाचा वेग वाढेल, असा दावा त्यांनी केला.

मोदींनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. टीएमसी सरकार विरोधकांवर दबाव टाकते, लोकशाही मूल्ये कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, टीएमसीकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, आगामी निवडणुकांत पुन्हा विजय मिळवू, असा दावा पक्षाने केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे भाजप ‘बदल’ आणि ‘विकास’चा नारा देत आहे, तर दुसरीकडे टीएमसी आपल्या कामगिरीच्या जोरावर मतदारांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पश्चिम बंगाल मधील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version