राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

निकालानंतर संतोष धुरींची घणाघाती टीका

राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)वर घणाघाती टीका केली आहे. “राज ठाकरेंच्या मनसेचा फायदा इतर पक्षांना झाला; पण मनसेलाच त्याचा कोणताही लाभ झाला नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला.

धुरी म्हणाले, “कुटुंब एकत्र आलं, मोठे राजकीय संकेत दिले गेले; मात्र प्रत्यक्षात मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं. ही वस्तुस्थिती मनसेसाठी गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ आहे.” मनसेची मते फुटली आणि त्याचा थेट फायदा इतर पक्षांना झाला; मात्र मनसे स्वतः या लढतीत पिछाडीवर राहिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत; काय आहेत वैशिष्ट्ये?

दिल्ली हे खलिस्तानी, बांगलादेशस्थित दहशतवाद्यांचे लक्ष्य

लुंगीने वाजवली पूंगी, अण्णामलाईंचा मुंबईत झाला फायदा

४० हून अधिक खटले असलेला नक्षलवादी कमांडर पापा राव ठार

“अजून किती वर्ष तुम्ही दुसऱ्यांना जिंकवत राहणार?” असा सवाल उपस्थित करत धुरी म्हणाले, “तुम्ही ‘लाव रे व्हिडीओ’चा मुद्दा उचलला, तेव्हा त्याचा फायदा काँग्रेसला झाला. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यावर त्यांनाही मनसेच्या मतांचा फायदा झाला; पण मनसेच्या वाट्याला मात्र जागाच आल्या नाहीत.”
पाहा व्हिडिओ –


मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मनसेने निवडणूक लढवल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फायदा भाजप व इतर पक्षांना मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, हेच मतविभाजन मनसेसाठी घातक ठरल्याची टीकाही धुरी यांनी केली. “राजकारणात प्रभाव असूनही तो प्रभाव जागांमध्ये रूपांतरित न होणे, हे अपयशाचे स्पष्ट लक्षण आहे,” असे ते म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भाजप व मित्रपक्षांनी भक्कम कामगिरी केली, तर मनसेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. निवडणूकपूर्व दावे आणि प्रत्यक्ष निकाल यातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. विशेष म्हणजे, पूर्वी मनसेत सक्रिय असलेले संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केलेली ही टीका अधिक महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version