….तर बीबीसीवर ५ अब्ज डॉलर्सपर्यंत खटला

ट्रम्प यांनी दिला इशारा

….तर बीबीसीवर ५ अब्ज डॉलर्सपर्यंत खटला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की ६ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी दिलेल्या भाषणाच्या व्हिडिओचे चुकीच्या पद्धतीने एडिटिंग झाल्याची कबुली आणि माफी मिळाल्यानंतरही ते पुढील आठवड्यात बीबीसीविरोधात ५ अब्ज डॉलर्सपर्यंत दावा दाखल करणार आहेत.

ट्रम्प म्हणाले की या चुकीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला आणि आर्थिक बाबींना “प्रचंड हानी” झाली असून बीबीसीची माफी अपुरी आहे.

ट्रम्प यांच्या वकिलांनी बीबीसीला सांगितले होते की, त्यांनी शुक्रवारीपर्यंत डॉक्युमेंटरी मागे घ्यावी, माफी मागावी आणि नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा किमान १ अब्ज डॉलर्सचा दावा दाखल केला जाईल.

बीबीसीने ही एडिटिंग “निर्णयातील चूक” असल्याचे मान्य केले आणि गुरुवारी ट्रम्प यांची वैयक्तिक माफी मागितली. मात्र, त्यांनी मानहानीचा आरोप नाकारला आणि कार्यक्रम पुन्हा प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

कारची मोकाट जनावराला धडक : तिघांचा मृत्यू

जया भट्टाचार्या ‘दिल्ली क्राइम ३’ मधल्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या ?

१२ राज्यात मतदारयादीचे SIR सुरू

व्हाइट नाइट कोअरची युद्ध-चिकित्सा तयारी अधिक मजबूत

एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले,
“आम्ही त्यांच्यावर १ अब्ज ते ५ अब्ज डॉलर्सपर्यंत दावा करणार आहोत, बहुधा पुढच्या आठवड्यात. त्यांनी स्वतः मान्य केले आहे की त्यांनी फसवणूक केली. त्यांनी माझ्या बोलण्यातील शब्दच बदलले.”

वादग्रस्त एडिट

बीबीसीच्या पॅनोरामा कार्यक्रमातील वादग्रस्त डॉक्युमेंटरीमध्ये ट्रम्प यांचे भाषणातील तीन तुकडे एकत्र जोडून त्यांच्यावर दंगल भडकवण्याचा आरोप आहे.

GB News वरील मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की हे एडिट “अविश्वसनीय” आहे. त्यांनी याची तुलना निवडणूक हस्तक्षेपाशी केली:

“फेक न्यूज हा चांगला शब्द आहे, पण हा प्रकार त्यापेक्षा पुढचा—हा भ्रष्टाचार आहे. त्यांनी माझ्या भाषणातील दोन भाग जोडले. एकात मला खलनायकासारखे दाखवले आणि दुसऱ्यात मी शांततेचे आवाहन करत होतो.”

बीबीसीची माफी आणि परिणाम

बीबीसीचे प्रमुख समीर शाह यांनी व्हाइट हाउसला वैयक्तिक पत्र पाठवून हे एडिटिंग “चूक” असल्याचे म्हटले. ब्रिटनच्या सांस्कृतिक  मंत्री लिसा नंदी यांनीही ही माफी “योग्य आणि आवश्यक” म्हटले.

बीबीसीला हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा कोणताही मानस नाही आणि Newsnightसह इतर कार्यक्रमांतही अशाच प्रकारचे एडिटिंग झाले असल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे.

बीबीसीवरील सर्वात मोठे संकट

या वादामुळे बीबीसी गेल्या अनेक दशकांतील सर्वांत मोठ्या संकटात सापडली आहे. पक्षपातीपणाचे आरोप आणि संपादकीय चुकांच्या पार्श्वभूमीवर डायरेक्टर जनरल टीम डेवी आणि हेड ऑफ न्यूज डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिला.

ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी संसदेत सांगितले की ते “मजबूत आणि स्वतंत्र बीबीसी”चे समर्थन करतात; परंतु संस्थेला स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांनी निष्पक्ष बातम्यांवरील जनविश्वास आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले.

बीबीसीला मोठ्या प्रमाणात निधी लायसन्स फीमधून मिळतो—आणि जर ट्रम्प यांच्या दाव्याची भरपाई सार्वजनिक पैशांतून करावी लागली तर त्याविरोधात “प्रचंड रोष” उसळेल, असा इशारा माजी मीडिया मंत्री जॉन व्हिटिंगडेल यांनी दिला.

Exit mobile version