शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) यांनी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उबाठा शिवसेना पक्षाच्या ते पचनी पडलेले नाही. मुंबईचा महापौर मराठीच हवा असा आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने रितू तावडेंच्या रूपात भाजपाची मराठी व्यक्ती उमेदवार झाली तरीही त्यावर खळखळ व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मुखपत्रात असा आरोप केला की या महापौर मराठी जनतेऐवजी उद्योगपतींच्या हितांना प्राधान्य देतील आणि मोठ्या व्यवसायांसाठी जमीन संपादन सुलभ करतील.
उबाठाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधील संपादकीयात म्हटले आहे की, मुंबई शहरात भाजपचा महापौर येणे हे संकट आहे. हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे आणि मराठी जनतेला दुःखी करणारा दिवस आहे. मुंबई महानगरपालिकेतील भाजपचा विजय आणि मुंबईत त्यांचा महापौर होणे हे मराठी जनतेच्या संघर्षावर पडलेली काळी छाया आहे. भाजप हा व्यापारी आणि श्रीमंत वर्गाच्या हितांचा विचार करणारा पक्ष असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
‘मराठी मतांमध्ये फूट पाडून सत्ता मिळवली’
संपादकीयात म्हटले आहे की भाजपने मराठी मतदारांमध्ये फूट पाडून सत्ता मिळवली. मुंबईचा महापौर बनवण्यासाठी पैशांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. जर शिवसेना (यूबीटी) ला बीएमसीची किल्ली मिळाली असती, तर भाजपला मुंबईची लूट थांबवता आली असती. मुंबईत शुद्ध मराठी महापौर होऊ नये यासाठी हा कट रचण्यात आला आणि तो यशस्वी करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरमध्ये गेम चेंजर ठरलेल्या S-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीला मंजुरी
हॉटेलचे बिल भरले नाही, पाकिस्तानी हॉकी संघ आला रस्त्यावर
एअर इंडिया विमानाचा अपघात “जाणूनबुजून केलेल्या कृत्याचा परिणाम” हा चुकीचा निष्कर्ष!
चांदीच्या किमतीत मोठी घसरण; गुंतवणूकदार संभ्रमात
पक्षाने दावा केला की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मोरारजी देसाई यांनी ज्या क्रूरतेने मराठी लोकांवर गोळीबार केला, त्याच क्रूर पद्धतीने भाजप मुंबईचा आत्मविश्वास खच्ची करत आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणे हे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे, असे संपादकीयात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीयात पुढे म्हटले आहे की, गेली चार वर्षे मुंबईची सत्ता प्रशासकांच्या हाती होती आणि या काळात ‘गुजरात लॉबी’च्या ठेकेदारांनी बीएमसीच्या तिजोरीची लूट केली. हजारो कोटी रुपयांची अशी कामे दाखवून बिले तयार करण्यात आली जी प्रत्यक्षात झालीच नाहीत आणि त्यातील मोठा ‘कट’ शहरी विकास विभागाकडे पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे आवाहन महापौरांना करण्यात आले आहे.
