अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू

अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला काश्मिरातील नागरिकांच्या हत्येला पुरस्कृत न करण्याचा इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना देणारा पाठिंबा न थांबवल्यास भारत अधिक सर्जिकल स्ट्राईक करेल असा इशारा दिला आहे. “सर्जिकल स्ट्राईकने हे सिद्ध केले की आम्ही हल्ले सहन करत नाही. जर तुम्ही उल्लंघन केले तर आणखी बरेच हल्ले होतील.” गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. “पीएम मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. आम्ही सत्तेत असताना भारताच्या सीमांना कोणीही बदलू आणू शकत नाही असा संदेश त्यांनी दिला. चर्चेची वेळ होती, पण आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे,” असे शहा म्हणाले.

हे ही वाचा:

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

भारतातील उरी, पठाणकोट आणि गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ साली पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले. या हल्ल्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्या उध्वस्त केल्या. २९ सप्टेंबर २०१६ रोजी उरी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले.

Exit mobile version