29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरअर्थजगतलसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

Google News Follow

Related

“भारत सरकार सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या बाबतीत चांगले काम करत आहे आणि हे निश्चितच हे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त आहे.” असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख गीता गोपीनाथ यांनी मंगळवारी सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या नवीनतम आकलनात भारतासाठी २०२१ साली वृद्धिदर ९.५ टक्के व्यक्त केला आहे.

“भारतासाठी या वर्षीच्या आमच्या वाढीच्या अंदाजात आम्ही बदल केलेला नाही. याचा अर्थ आहे की भारत खूप, खूप कठीण दुसऱ्या लाटेतून बाहेर आला आणि यामुळे जुलैमध्ये मोठी घसरण झाली पण आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही कारण त्यानंतर भारताने खूप वेगाने लसीकरण केला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा खूप वेगाने वाढत आहे.” असे आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी मंगळवारी व्हर्च्युअल कॉन्फरन्स कॉल दरम्यान पत्रकारांना सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी करण्यात आलेल्या नवीनतम अपडेटनुसार, कोविड -१९ महामारीमुळे ७.३ टक्के संकुचित झालेली भारताची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये. ८.५ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.

जागतिक अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ५.९ टक्के आणि २०२२ मध्ये ४.९ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका या वर्षी सहा टक्के आणि पुढच्या वर्षी ५.२ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, आयएमएफने म्हटले आहे की, चीनची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के वाढेल.

हे ही वाचा:

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

“कोविड-१९ महामारी अद्याप गेलेली नाही. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. भारत सरकार लसीकरणाच्या दराच्या बाबतीत चांगले काम करत आहेत आणि ते नक्कीच उपयुक्त आहे.” असं गीता गोपीनाथ म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा