28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

Related

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर याचा आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. बुधवार १३ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. शार्दुल ठाकूर आधी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समाविष्ट होता. पण आता फिरकीपटू अक्सर पटेल सोबत त्याची अदलाबदली करण्यात आली आहे. त्यामुळे शार्दुल हा पंधरा जणांच्या भारतीय संघाचा एक भाग असणार आहे. तर अक्सर पटेल हा राखीव खेळाडूंमध्ये असेल.

या अदलाबदली मागचे कारण दुखापत नसून रणनीती असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाला शार्दुल ठाकूर हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. सध्द्या भारतीय चमूतील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या तंदुरुस्ती बाबत अजुनही प्रश्न चिन्ह आहे. हार्दिक फलंदाजी करू शकत असला तरीही त्याच्या गोलंदाजी बद्दल कुठलीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे नुकत्याच इंग्लंड मध्ये पार पडलेला कसोटी मालिकेत शार्दुलने त्याच्या फलंदाजीची चमक दाखवून दिली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुलकडे भारतीय संघ पाहू शकतो.

हे ही वाचा:

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

पुन्हा एकदा ‘मौका मौका’

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

भारतीय संघाने जाहीर केलेल्या या बदलानंतर आगामी आयसीसी टी-२० पुरुष विश्वचषकातील भारतीय संघ हा खालील प्रमाणे असणार आहे.

मुख्य संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के.एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, अक्सर पटेल आणि दिपक चहर

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा