बीसीसीआय आगामी एपेक्स कौन्सिल बैठक भारतीय पुरुष संघाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये संभाव्य बदलांसंदर्भात काही प्रस्ताव तयार केले असून, त्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रस्ताव अद्याप औपचारिकरित्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर झालेले नाहीत. मात्र, पुढील एपेक्स कौन्सिल मीटिंगच्या अजेंड्यात त्यांचा समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाची चर्चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेडिंग सिस्टीमवर होण्याची अपेक्षा आहे. सध्या खेळाडूंना A+, A, B आणि C अशा चार गटांत विभागण्यात आले आहे. यामध्ये अनुक्रमे ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये वार्षिक रिटेनर दिला जातो. सूत्रांच्या मते, A+ ग्रेड हळूहळू बंद करण्याचा विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास, रिटेनर रकमेतही बदल होण्याची शक्यता आहे.
सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे A+ ग्रेडमध्ये आहेत. मात्र बदलत्या क्रिकेट कॅलेंडरमुळे आणि खेळाडूंच्या फॉरमॅटनिहाय उपलब्धतेमुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, केवळ मर्यादित फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंना सर्वोच्च ग्रेडमध्ये ठेवावे का?
रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत, तर रवींद्र जडेजा टेस्ट आणि वनडेपर्यंत मर्यादित आहे. जर सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट प्रणाली कामगिरी आणि फॉरमॅट उपलब्धतेशी जोडली गेली, तर रोहित आणि विराट यांच्या ग्रेडमध्ये घसरण होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या वार्षिक सॅलरीवर होऊ शकतो.
हेही वाचा:
येत्या पाच वर्षांत मुंब्रा हिरवा करू!
पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील अभियंत्याच्या मृत्यु्प्रकरणी बिल्डर अटकेत
कमजोर भिंती फोडून घरात, दुकानात शिरणारी टोळी जेरबंद
“आम्ही नोबेल पुरस्कार देत नाही” नॉर्वेच्या पंतप्रधानांनी हात झटकले
२१ एप्रिल २०२५ रोजी जाहीर झालेल्या २०२४-२५ सत्राच्या कॉन्ट्रॅक्ट यादीनुसार, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत हे ग्रेड Aमध्ये होते. टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचा ग्रेड Bमध्ये समावेश होता, तर अनेक युवा खेळाडूंना ग्रेड Cमध्ये स्थान देण्यात आले होते.
आता सर्वांचे लक्ष बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिल बैठकीकडे लागले असून, या बैठकीत भारतीय क्रिकेटचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टम पुढील काळात नेमक्या कोणत्या दिशेने जाणार, याचा निर्णय होणार आहे.
