चेस-जंगूची विक्रमी भागीदारी! १४९ वर्षांचा इतिहास बदलला

सहाव्या विकेटसाठी ४०१ धावांचा विश्वविक्रम

चेस-जंगूची विक्रमी भागीदारी! १४९ वर्षांचा इतिहास बदलला

नॉर्थ साऊंड येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत कर्णधार रॉस्टन चेस आणि युवा फलंदाज आमीर जंगू यांनी इतिहास रचला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ४०१ धावांची भागीदारी करत कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सहाव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी नोंदवली.

वेस्ट इंडिजची अवस्था एकवेळ ५ बाद १६८ अशी झाली होती. मात्र चेस आणि जंगू यांनी संघाचा डाव सावरत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आमीर जंगूने २३३ धावांची द्विशतकी खेळी केली, तर रॉस्टन चेस १९४ धावांवर बाद झाला. त्याचे द्विशतक अवघ्या सहा धावांनी हुकले.
हे ही वाचा:
जम्मूत नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, पंतप्रधानांचे आभार

रोइंगमध्ये भारताला पहिले जागतिक सुवर्णपदक

अमरावतीत भरधाव कार ट्रकवर धडकली

सेशेल्समध्ये पंतप्रधान मोदींना ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ चा सर्वोच्च सन्मान

या जोडीने २०१६ मध्ये इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी केलेल्या ३९९ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. या विक्रमी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला डाव ९ बाद ६२६ धावांवर घोषित करत श्रीलंकेवर ३१८ धावांची मोठी आघाडी घेतली. दिवसअखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात १ बाद १५ धावा केल्या असून, सामन्यावर वेस्ट इंडिजची मजबूत पकड आहे.

Exit mobile version