इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतरभारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटपटूंच्या इच्छाशक्तीला आळा घालण्याची तयारी करत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे संघातील स्टार संस्कृतीच्या विरोधात आहेत. आणि या संदर्भात बीसीसीआय आता कठोर निर्णय घेण्याचा विचार करत आहे.
बीसीसीआय आता असा नियम बनवणार आहे. ज्यामध्ये क्रिकेटपटू त्यांच्या इच्छेनुसार सामने निवडू शकणार नाहीत. इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा प्रभाव वाढण्याची अपेक्षा आहे.
जसप्रीत बुमराह दोन सामन्यांमध्ये कामाच्या तणावामुळे अनुपलब्ध झाल्यानंतर मोहम्मद सिराजने ज्या पद्धतीने कामगिरी केली.त्यामुळे गंभीरला आता स्वतःच्या इच्छेनुसार संघ संस्कृती निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.
बुमराहने कामाच्या तणावाचे कारण देत मालिकेतील तीन सामने खेळले.तर सिराजने पाचही सामन्यांमध्ये भाग घेतला आणि २३ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. निवड समिती, गंभीर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निर्णय घेणारे अधिकारी वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली क्रिकेटपटूंना त्यांच्या मर्जीने सामने आणि मालिका खेळण्याची पद्धत थांबवण्याबाबत विचाराधीन आहेत.
केंद्रीय करार असलेल्या क्रिकेटपटूंना विशेषतः जे सर्व फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळतात. त्यांना सांगण्यात आले आहे की, भविष्यात स्वतःच्या मर्जीने सामने निवडण्याची संस्कृती चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की, कामाच्या तणावाकडे लक्ष दिले जाणार नाही. पण क्रिकेटपटू त्याच्या नावाखाली महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर राहू शकत नाहीत.
