आयसीसीने पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या महिला टी२० चॅलेंज ट्रॉफी २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा स्पर्धा १९ एप्रिल ते २ मे दरम्यान रवांडा येथे खेळवला जाणार आहे.
सर्व सामने किगाली शहरातील गहांगा क्रिकेट स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या दोन मैदानांवर होणार आहेत.
या स्पर्धेत एकूण ५ संघांचा सहभाग असून, उद्घाटन दिवशी इटली विरुद्ध रवांडा आणि नेपाळ विरुद्ध यूएसए असे सामने रंगणार आहेत. तर वानुअतु संघाला पहिल्या दिवशी बाय मिळाली आहे.
ही स्पर्धा आयसीसीने विशेषतः असोसिएट सदस्य देशांना अधिक संधी मिळावी या उद्देशाने सुरू केली आहे. ही स्पर्धा ‘इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी’चा भाग असून, महिला क्रिकेटचा विस्तार करण्याच्या दिशेने मोठं पाऊल मानलं जात आहे.
या स्पर्धेत आयसीसीच्या पाचही क्षेत्रांतील टॉप संघ सहभागी आहेत, जे याआधी मुख्य स्पर्धांसाठी पात्र ठरू शकले नव्हते. सर्व संघांनी २०२५ महिला टी२० वर्ल्ड कप क्वालिफायरमधील कामगिरीच्या आधारे प्रवेश मिळवला आहे.
स्पर्धा डबल राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून, प्रत्येक संघाला सातत्याने आणि उच्च दर्जाच्या सामन्यांचा अनुभव मिळणार आहे.
दरम्यान, आयसीसीच्या महिला क्रिकेट विस्तार योजनेनुसार,
👉 २०२६ महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये १२ संघ असतील
👉 २०३० पर्यंत हा आकडा १६ संघांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे
नेपाळ (२१वा क्रमांक) हा या स्पर्धेतील सर्वात उच्च रँकिंगचा संघ आहे, तर यूएसए देखील मजबूत दावेदार मानला जात आहे.
तसेच वानुअतु (३०वा क्रमांक) संघाने अलीकडील क्वालिफायरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपली छाप पाडली आहे.
महत्त्वाचे सामने
- १९ एप्रिल – रवांडा vs इटली, नेपाळ vs यूएसए
- २१ एप्रिल – रवांडा vs यूएसए
- २४ एप्रिल – नेपाळ vs वानुअतु
- १ मे – रवांडा vs यूएसए, इटली vs नेपाळ
