बुमराहला पहिली ओव्हर देण्याचा हार्दिकचा ‘मास्टरस्ट्रोक

बुमराहला पहिली ओव्हर देण्याचा हार्दिकचा ‘मास्टरस्ट्रोक

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपली धमाकेदार पुनरागमनाची नोंद केली. कर्णधार हार्दिक पांड्याने बुमराहला पहिलं ओव्हर देण्याचा घेतलेला निर्णय हा खरा ‘गेम-चेंजर’ ठरल्याचं मत माजी न्यूझीलंड वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनाघन यांनी व्यक्त केलं.

स्टार स्पोर्ट्सवरील ‘अमूल क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना मॅक्लेनाघन म्हणाले:

“हार्दिकने बुमराहला नवीन चेंडू दिला, हा खरोखर मास्टरस्ट्रोक होता. MI कडे दुसरा कुठलाही गोलंदाज नवीन चेंडूने प्रभाव टाकत नव्हता, त्यामुळे बुमराहचा आक्रमक शस्त्र म्हणून वापर गरजेचा होता.”

हार्दिकने GT च्या मजबूत सलामी जोडीला तोडण्यासाठी सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच बुमराहचा वापर केला आणि बुमराहने साई सुदर्शनला पहिल्याच चेंडूवर बाद करत संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.

मॅक्लेनाघन पुढे म्हणाले की,
GT हा संघ आपल्या सलामी जोडीवर खूप अवलंबून असतो. एकदा ही जोडी तुटली की त्यांचा मधला फळी कमकुवत ठरतो — आणि MI ने नेमकं त्याचाच फायदा घेतला.

हेही वाचा :

सोनं-चांदी दरात मोठी घसरण; जागतिक दबावामुळे बाजार अस्थिर

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स ७५३ अंकांनी वधारला

भारतीय ऍथलेटिक्सवर ‘अत्यंत उच्च डोपिंग जोखीम’चा ठपका

जर्मनीतील गुरुद्वारात संघर्ष; शस्त्रांसह ४० जण भिडले

बुमराहसाठी मोठा दिलासा:

“बुमराहसारख्या दर्जेदार गोलंदाजाला सलग सामने विकेटशिवाय जाणं खूप त्रासदायक असतं. पण आता तो पुन्हा लयीत येताना दिसतोय,” असेही मॅक्लेनाघन म्हणाले.

या सामन्यात मुंबईने तिलक वर्माच्या १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर ५ बाद १९९ धावा* केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १०० धावांत आटोपला आणि मुंबईने ९९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Exit mobile version