निकोलस पूरनने वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास

निकोलस पूरनने वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास

वेस्ट इंडिजचा डावखुरा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर निकोलस पूरन याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला. अवघ्या २९व्या वर्षी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतात आणि चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली जात आहे. आयसीसीने पूरनच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.

पूरनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे भावनिक शब्दांत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. तो म्हणाला, “मी बराच विचार करून आणि सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मॅरून जर्सी घालणे, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं, आणि मैदानावर वेस्ट इंडिजसाठी सर्वस्व देणं – हे माझ्यासाठी अतिशय विशेष होतं. टीमचं नेतृत्व करणं हे माझ्या आयुष्यातलं मोठं भाग्य होतं.”

पूरनने पुढे चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “चाहत्यांनो, तुमच्या अपार प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्ही कठीण प्रसंगी साथ दिली आणि आनंदाचे क्षण साजरे केले. माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो.”

निकोलस पूरनने २०१४ साली अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळताना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. २०१६ मध्ये त्याने टी२० फॉर्मेटमध्ये पदार्पण केले, तर २०१८ मध्ये त्याला वनडे संघात स्थान मिळाले. त्याने २०१९ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. २०२१ मध्ये टी२० वर्ल्ड कपसाठी तो उपकर्णधार होता आणि २०२२ मध्ये व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवले.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक हेनरिक क्लासेन यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेचच पूरननेही निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version