भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या विक्रमाची नोंद केली. या सामन्यात त्याने जगातील वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला. ‘हिटमॅन’ रोहितने सामन्याची सुरुवात केली तेव्हा त्याच्या खात्यात ३४९ षटकार होते. विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त तीन षटकारांची गरज होती. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (३५१) दीर्घकाळ टिकलेला विक्रम मागे पडला.
रोहितचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या डावाच्या २०व्या षटकात रोहितने अफलातून फटका मारत आपला ३५२ वा षटकार नोंदवला. त्याच क्षणी संपूर्ण मैदानात जल्लोष पसरला आणि भारतीय ड्रेसिंग रूममधूनही टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहित त्यांच्या जबरदस्त टाइमिंगसाठी आणि सहज फटकेबाजीसाठी जगप्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हा विक्रम त्याने आफ्रिदीपेक्षा तब्बल १०० डाव कमी खेळून गाठला आहे.
हे ही वाचा:
पत्नीने संतापाच्या भारत केली पतीची हत्या
‘सरस आजीविका फूड फेस्टिव्हल’चे होणार उद्घाटन
हरयाणातील विद्यार्थ्याची ब्रिटनमध्ये हत्या
वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा (भारत) – ३५२ षटकार
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ३५१
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ३३१
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – २७०
एम. एस. धोनी (भारत) – २२९
आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत ३५१ षटकार मारत अनेक वर्षे हा विक्रम कायम ठेवला होता. मात्र रोहितच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी झपाट्याने आफ्रिदीशी असलेले अंतर भरून काढले आणि आता त्यांना मागे टाकले आहे.
रोहितचा सध्याचा आकडा ३५२* षटकारांवर पोहोचला असून तो जलदगतीने वाढत आहे. या कामगिरीमुळे त्याने ख्रिस गेल व जयसूर्या यांसारख्या दमदार फलंदाजांनाही मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहितची खेळी
रोहितने यशस्वी जैस्वालसोबत भारतासाठी डावाची सुरुवात केली. जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर रोहितने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली. यामुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूत केली. रोहित अखेर ५७ धावा (५१ चेंडू) करून बाद झाला. त्याला मार्को जान्सनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ही कामगिरी रोहित शर्माला वनडे इतिहासातील सर्वात विध्वंसक आणि प्रतिष्ठित फलंदाजांपैकी एक म्हणून पुन्हा सिद्ध करते.
