सावध व्हा! अमेरिका साखर पेरणी करते आहे… |

सावध व्हा! अमेरिका साखर पेरणी करते आहे... | Dinesh Kanji | Narendra Modi | Donald Trump |

व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नावारो यांच्या ताज्या विधानामुळे अमेरिकेच्या राजकारणाचे किती पोतेरे झाले आहे, हे लक्षात येते. भारताकडून होणाऱ्या रशियन तेलाच्या खरेदीमुळे फक्त ब्राह्मणांचे उखळ पांढरे होत असल्याचा दावा नावारो यांनी केला आहे. जातीचे राजकारणाचे अमेरिकीकरण झाले की अमेरिकेच्या राजकारणाचे भारतीयकरण झाले हे कळायला मार्ग नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. परंतु सोरोस यांची धोरणे मात्र ट्रम्प सुरू ठेवणारे यांचे संकेत नावारोव्ह यांच्या विधानामुळे मिळालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी चीन दौऱ्यावर आहेत. आज ते मायदेशी परततील. ज्या भारताचा चीनविरोधात वापर करायचा होता, तो भारत चीनच्या सोबत ठामपणे उभा असल्याचे पाहून अमेरिकी नेतृत्वाला इंगळ्या डसणे स्वाभाविक होते. त्यामुळे मोदींच्या विरोधात किंवा भारताच्या विरोधात ट्रम्प प्रशासनाचे काही जहरी वक्तव्य अपेक्षित होते. ट्रम्प यांचे संजय राऊत म्हणजे पीटर नावारो यांनी या अपेक्षेची पूर्तता केली आहे. रशियन तेलाचे निमित्त करू भारताच्या जाती व्यवस्थेवर टीप्पणी करून घेतलेली आहे.

Exit mobile version