कधी कधी आयुष्यात असा एखादा क्षण येतो, जो सगळं काही बदलून टाकतो. हरियाणातील सिरसा जिल्ह्यात राहणाऱ्या एका साध्या मजुरासाठी असाच अविश्वसनीय क्षण आला आहे. रोज कष्टाची कामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या मजुराने अवघ्या ५०० रुपयांचं लॉटरी तिकीट घेतलं… आणि नशिबानं त्याच्या पदरात थेट १० कोटी रुपयांची लॉटरी टाकली.
हा मजूर रोजच्या प्रमाणे आपलं काम करत होता. मोठी स्वप्नं किंवा श्रीमंतीची अपेक्षा त्याच्या मनात नव्हती. बाजारात जाताना सहज म्हणून त्याने १००, २०० आणि ५०० रुपयांची अशी तीन लॉटरी तिकिटं घेतली. मात्र त्यातील ५०० रुपयांचं तिकीट त्याचं आयुष्य बदलणारं ठरेल, याची त्यालाही कल्पना नव्हती.
हे ही वाचा:
दारूगोळा उत्पादनात भारत करणार स्फोटक कामगिरी
ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात युरोपियन संघ सार्वभौमत्वाचे अस्त्र वापरणार
खड्ड्यातल्या थंड पाण्यामुळे बुडालेल्या इंजिनियरला वाचवण्यात अपयश
फुटपाथवर भाजी विकणाऱ्या सावंत मावशीचा मुलगा झाला सीआरपीएफचा जवान
जेव्हा लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि १० कोटींचं बक्षीस आपल्यालाच लागल्याचं समजलं, तेव्हा सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही. त्याने अनेक वेळा तिकीट तपासलं, इतरांना दाखवलं. अखेर खात्री झाल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
ही बातमी गावात पसरताच आनंदाचं वातावरण निर्माण झालं. घरात उत्सव साजरा झाला. पत्नी, मुलं आणि नातेवाईक सगळेच आनंदाने भारावून गेले. कालपर्यंत रोजच्या गरजांसाठी धडपड करणारा हा कुटुंबप्रमुख, आज अचानक करोडपती झाला होता. कर वजा गेल्यानंतरही त्याच्या हातात मोठी रक्कम येणार आहे. या पैशातून तो स्वतःचं घर बांधण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा आणि छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे.
