थायलंडमध्ये रेल्वेवर बांधकाम करणारी क्रेन पडल्याने भीषण अपघात झाला. सकाळी झालेल्या या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. थायलंड मधील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, ही ट्रेन थायलंडची राजधानी बँकॉकहून देशाच्या ईशान्येकडील प्रदेशात जात होती.
बँकॉकपासून २३० किमी ईशान्येला असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. ही ट्रेन उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. क्रेन एका हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करत असताना कोसळली आणि ती जाणाऱ्या ट्रेनवर आदळली. या घटनेमुळे डबा रुळावरून घसरला आणि आग लागली. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल केले जात आहे.
हे ही वाचा..
“मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्या”
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वाजले बिगुल! ५ फेब्रुवारीला मतदान
दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित
रशियन तेल टँकरमधून अटक केलेल्या तीन भारतीयांची सुटका
वाहतूक मंत्री पिफट रत्चकितप्रकन यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये तब्बल १९५ लोक होते. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “आज सकाळी (१४ जानेवारी) ९:०५ वाजता नाखोन रत्चासिमा येथील सिखिओ येथे हाय-स्पीड रेल्वे पुलासाठी बांधकाम करणारी क्रेन चालत्या प्रवासी ट्रेनवर कोसळली. ट्रेन रुळावरून घसरली आणि आग लागली. ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले, अनेक जण डब्यांमध्ये अडकले. अनेक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत,” असे थायलंड सरकारने सांगितले.
