निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांना सुनावले!

प्रचार संपल्यावर घरोघरी जाण्याची उमेदवारांना मुभा

निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांना सुनावले!
महानगर पालिका निवडणुकांचा प्रचार मंगळवारी संपुष्टात आल्यावर आता घरोघरी जाऊन प्रचार करणे उमेदवारांना शक्य आहे, या नियमावरून गोंधळ उडाला. असा नियम कसा काय करता येईल असा सवाल पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे याना केल्यावर हा नियम २०१२ पासून आहे, आज केलेला नाही, अशा शब्दात आयुक्तांनी पत्रकारांना खडसावले.
 निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी एकूण १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होईल.

 

हे ही वाचा:
‘केरलम’ साठी केरळात भाजपा डाव्यांच्या पाठीशी
दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित
जगाची साडेसाती भारताची फलप्राप्ती… ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात मिळाली ऊर्जा
मनसेच्या स्नेहिता डेहलीकर यांचा प्रचाराचा झंझावात

 

राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा नियम खास नियम सांगितला आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर सभा, बैठका, रॅली यांना मनाई आहे. परंतु उमेदवार मतदारांना वैयक्तिकरित्या भेटू शकतो. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

 

या नियमावरून गदारोळ झाला. आताच हा नियम कसा केला गेला, त्यामागे कोणते कारण आहे असा सवाल विचारण्यात आला. त्याबद्दल निवडणूक आयुक्तांनी सदर स्पष्टीकरण दिले.

 

उमेदवाराच्या समर्थकांकडून मतदानाच्या आदल्या दिवशी कथितपणे वाटल्या जाणाऱ्या पैशांविषयी निवडणूक आयोगाची भूमिका काय असे विचारल्यावर. यावर बोलताना, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आचारसंहितेच्या नियमाबाबत सांगितले. पैसे घरोघरी वाटण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या महापालिका आयुक्तांना पाठवतो. ते या तक्रारीचं निराकरण करतात, असे दिनेश वाघमारे यांनी सांगितले. तसेच साडेपाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. त्याबाबतचा नियम आहे. कलम ३७ नुसार पाच लोकं एकत्र येऊ शकत नाही. पण व्यक्तिगत कोणी एकमेकांच्या घरी गेला तर अडचण नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, प्रचाराच्या काही कॅटेगिरी आहेत. सभा, मिरवणूक, रॅली या सर्व बंद होतील. पण उमेदवार व्यक्तिगत घरोघरी जाऊ शकतात. व्यक्तीगट भेटीगाठी घेता येतात. नियम काहीच बदलले नाहीत. लोकसभा आणि विधानसभेतही तेच नियम होते. डोअर टू डोअर व्यक्तीगत जाता येते. एकटा उमेदवार घरोघरी जाऊन चर्चा करू शकतो. पाचपेक्षा जास्त लोकं डोअर टू डोअर गेले तर नियमभंग आहे. एकटा व्यक्ती गेला तर नियम भंग नाही, असा नियम वाघमारे यांनी सांगितला.

.

 

Exit mobile version