मालाड पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ४६च्या मनसेच्या उमेदवार स्नेहिता संदेश डेहलीकर यांनी या प्रभागात झंझावाती प्रचार केला आहे. प्रत्यक्ष लोकांशी संपर्क करण्याबरोबरच रॅलीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत आपल्या कामाचा प्रचार केला आहे.
स्नेहिता यांच्या प्रचारासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेही उपस्थित होते. स्नेहिता यांच्या या प्रचारयात्रांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
हे ही वाचा:
‘द ५०’ आणि धनश्री वर्मा यांच्याबाबतच्या अफवांवर युजवेंद्र चहल यांचे स्पष्टीकरण
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वाजले बिगुल! ५ फेब्रुवारीला मतदान
बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या
बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या हिंदू नेत्याचा पोलिस कोठडीत मृत्यू
या प्रभागातील लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण तत्पर राहू असे आश्वासन स्नेहिता यांनी दिले आहे. चला जिंकूया असा आत्मविश्वास त्यांच्या घोषणांमधून दिसून येतो आहे. या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावाही स्नेहिता यांनी केला आहे.
