पुणे: ‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवर आधारित गणेश देखावा!

पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या प्रतिकृती 

पुणे: ‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवर आधारित गणेश देखावा!

गणेश बाप्पाच्या आगमनाने देशभरात आंनदाचे वातावरण असून भाविक मनोभावाने गणेशाची पूजा-आरती करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पाच्या वेगवेगळ्या सुंदर मूर्ती बघायला मिळत आहेत. तसेच अनेकांनी विविध प्रकारचे देखावे केले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका तरुणीने घरात ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा केला असून परिसरात याची चर्चा होत आहे. ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानवर केलेली कारवाई ही भारत आणि सैन्याची ताकद दर्शविते. तसेच हा नवा भारत असल्याचे स्पष्ट करते. याच प्रभावाने ऐश्वर्या जाधव या तरुणीने घरात ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा तयार केला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवरील देखाव्यात पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या प्रतिकृती सादर केल्या गेल्या आहेत. भारतीय सैनिक, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रणगाडे, फायटर जेटच्या सुद्धा प्रतिकृती देखाव्यात दाखवण्यात आल्या आहेत.

एएनआयशी संवाद साधताना ऐश्वर्या जाधव म्हणाली, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या नव्या लष्करी धोरणाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अचूक आणि संयमित प्रत्युत्तर दिले. अवघ्या २३ मिनिटांत ९ दहशतवादी ठिकाणांचा नाश करण्यात आला. ही कारवाई केवळ लष्कराच्या क्षमतेचे नव्हे, तर आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचेही प्रतीक आहे.

हे ही वाचा : 

आर्थिक संकेतकांमध्ये का होणार सुधारणा

भारत-जपानची भागीदारी गुंतवणुकीतून काय साध्य होणार

आसाराम बापू जोधपूर जेलमध्ये

ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण संविधानाविरुद्ध, अधिकारांचा गैरवापर…

ती पुढे म्हणाली, “नवा भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशभक्ती जागवण्यासाठी आणि जवानांच्या शौर्याची आठवण करून देण्यासाठी हा देखावा सादर करण्यात आला आहे.” ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमद्वारे साकारलेला हा देखावा नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करणारा एक अभिनव उपक्रम ठरत आहे.

Exit mobile version