उज्जैनमध्ये अवैध बांधकामांवर कारवाई

उज्जैनमध्ये अवैध बांधकामांवर कारवाई

मध्यप्रदेशातील धार्मिक नगरी उज्जैनमध्ये अवैध बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू असून गुरुवारीदेखील महाकालेश्वर मंदिर परिसराजवळ झालेली अवैध बांधकामे पाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, श्री महाकाल मंदिर क्षेत्राच्या ५०० मीटर परिघात येणाऱ्या बेगमबाग कॉलनीतील नियमबाह्य बांधकामांवर कारवाई सुरू आहे. यासाठी उज्जैन विकास प्राधिकरण, नगर निगम व पोलीस प्रशासन यांची संयुक्त मोहीम सुरू आहे.

या कारवाईसाठी पाच जेसीबी आणि चार पोकलेन मशीन लावण्यात आल्या आहेत. तसेच मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. अनुविभागीय अधिकारी (राजस्व) एल. एन. गर्ग यांनी आयएएनएसला सांगितले की, बेगमबाग भागात ज्यांनी लीजच्या अटींचे उल्लंघन करून बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर ही कारवाई होत आहे. पाच प्लॉट्सवर बांधलेले दोन हॉटेल, रेस्टॉरंटसह ११ घरे आणि दुकाने पाडली जात आहेत.

हेही वाचा..

नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या मागे हिंदू राजाचे चित्र! काय मिळतो संदेश?

‘परिस्थिती सारखीच’: कॉंग्रेसच्या उदित राज यांनी नेपाळची तुलना भारताशी केली, भाजपाचे प्रत्युत्तर!

“अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” दोहा हल्ल्यानंतर नेतान्याहू असं का म्हणाले?

भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या

माहितीनुसार, बेगमबाग हा मुस्लिमबहुल भाग आहे आणि गेल्या तीन महिन्यांत येथे चौथी वेळा कारवाई झाली आहे. एकूण २८ मालमत्ता चिन्हांकित असून त्यावर ६० हून अधिक बांधकामे आहेत. उज्जैन विकास प्राधिकरणाने येथील लोकांना भूखंड लीजवर दिले होते, परंतु काहींनी लीजचे नूतनीकरण केले नाही तर काहींनी आपली मालमत्ता किंवा भूखंड बेकायदेशीररीत्या विकले होते. त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे.

काही भूखंडमालकांनी प्राधिकरणाकडून नोटीस मिळाल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांच्यावरील कारवाई केली जात आहे. उज्जैनमध्ये सन २०२८ मध्ये सिंहस्थ सोहळ्याचे आयोजन होणार आहे. या वेळी लाखो भाविक येथे दाखल होतील. त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन आवश्यक व्यवस्था करत आहे. जे अतिक्रमण वाहतुकीत अडथळा ठरते, ते हटविण्यात येत आहे. सिंहस्थ लक्षात घेऊन अनेक विकासकामे सुरू आहेत. क्षिप्रा नदीच्या घाटांचे बांधकाम सुरू आहे.

Exit mobile version